IIT पासून Nyka पर्यंत, देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी; स्टायपेंड तब्बल १.५ लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:35 PM2022-08-12T19:35:07+5:302022-08-12T19:35:42+5:30

करिअर-टेक प्लॅटफॉर्म 'इंटर्नशाला'नं एका नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'सपनों की कंपनी के साथ इंटर्नशिप' असं नाव देण्यात आलं आहे.

internship 2022 for graduation students in iit nykaa offers internshala know how to apply | IIT पासून Nyka पर्यंत, देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी; स्टायपेंड तब्बल १.५ लाख रुपये!

IIT पासून Nyka पर्यंत, देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी; स्टायपेंड तब्बल १.५ लाख रुपये!

Next

करिअर-टेक प्लॅटफॉर्म 'इंटर्नशाला'नं एका नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'सपनों की कंपनी के साथ इंटर्नशिप' असं नाव देण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थ्यांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. इंटर्नशिपसाठी निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेच्या आधारे केली जाईल. या कालावधीत विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांचे स्टायपेंडही दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना देशातील काही मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी यातून मिळणार आहे. 

इंटर्नशिपच्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना टायटन, बॉश, डिस्ने स्टार, व्होल्वो, नायका फॅशन, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया, फोनपे, अर्बन कंपनी, रेडिओ सिटी एफएममध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर डिकॅथलॉन, आर्चीज, लेन्सकार्ट, कल्टफिट, एचडीएफएसी अॅर्गो, इडियट, मेन्सएक्सपी, बुक माय शो, विस्तारा या कंपन्यांमध्येही इंटर्नशिप करता येणार आहे. Justdile, Outlook, Delhivery, IIT Bombay, Sportskeeda, Economics Times, ET Edge, HT Media, PR पंडित, फॅशन टीव्ही, आदित्य बिर्ला कॅपिटल, LBB सारख्या कंपन्या देखील इंटर्नशिप ऑफर करत आहेत.

१.५ लाख रुपये मिळेल स्टायपेंड
इच्छुक उमेदवार ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार, इंटर्नशिपसाठी प्रारंभिक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमांतर्गत इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना या कंपन्यांमध्ये शिकण्याची संधी तर मिळेलच शिवाय त्यांना भरघोस स्टायपेंडही दिला जाईल. इंटर्नशिप कालावधीत दिले जाणारे सर्वाधिक स्टायपेंड रुपये 1.5 लाख आहे. निवडलेले उमेदवार विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन 10,000 रुपयांपर्यंतची रोख बक्षिसेही जिंकू शकतात.

शिक्षणाची संधी मिळणाऱ्या इंटर्नशिपच्या शोधात विद्यार्थी
"सध्या विद्यार्थ्यांमधील तीव्र स्पर्धेच्या काळात ते अशा इंटर्नशिपमध्ये स्वारस्य दाखवत आहेत जे त्यांना केवळ स्टायपेंड नव्हे, तर शिकण्याचा अनुभव देखील देतील. इच्छुक विद्यार्थ्यांमधील ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ड्रीम कंपन्यांसह इंटर्नशिप हा एक उपक्रम आहे जो आम्ही भारतातील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशाला मिशनमधून उपलब्ध करुन देत आहोत", असं इंटर्नशिप उपक्रमाचा शुभारंभ करताना इंटर्नशीपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वेश अग्रवाल म्हणाले. 

Web Title: internship 2022 for graduation students in iit nykaa offers internshala know how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.