पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 11:30 AM2022-05-07T11:30:59+5:302022-05-07T11:32:15+5:30

IOCL Recruitment 2022 : GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे. 

IOCL Recruitment 2022 : apply for engineers graduate apprentice engineer posts | पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

googlenewsNext

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited, IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL)  ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर (GAE) पदाच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे. 

अधिसूचनेनुसार, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर एससी आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या विषयांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. तसेच, काही उमेदवारांची निवड पदवीधर शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून खालील विषयांमध्ये केली जाईल. जसे की, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिकाऊ कायदा, 1961 (आणि त्यानंतरच्या सुधारणा) नुसार  पदवीधरांची देखील शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून नियुक्तीसाठी निवड केली जाणार आहे. 

महत्वाची तारीख 
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2022 

शैक्षणिक पात्रता
B.Tech./BE/संबंधित विषयात AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालयं/विद्यापीठ/डीम्ड युनिव्हर्सिटीमधील समतुल्य पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रम 65 टक्के गुणांसह (SC/ST/PWD साठी 55%). ज्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात M.Tech पूर्ण केले आहे / करत आहेत, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. जर त्यांनी GATE 2022 परीक्षेत पात्र विषयात आणि B.Tech मध्ये नमूद केलेल्या विषयांपैकी एका विषयात प्रवेश केला असेल. /BE पूर्ण केलेअसेल.

वयोमर्यादा
सामान्य, EWS दोन्ही श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांचं वय 26 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 

ग्रेजुएट अपरेंटिस इंजिनीअर
- केमिकल इंजिनीअरिंग 
- असैनिक अभियंत्रण 
- कंप्यूटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग 
- विद्युत अभियन्त्रण 
- इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग 
- मॅकेनिकल इंजिनीअरिंग 
- धातुकर्म इंजिनीअरिंग

वेतन 
अभियंता/अधिकारी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीचे बेसिक वेतन दरमहा 50,000/-  रुपयांपर्यंत दिले जाईल.

निवड प्रक्रिया 'या' आधारावर केली जाईल...
- ग्रुप कन्व्हेर्सेशन (GD)
- ग्रुप टास्क (GT)
- वैयक्तिक मुलाखत (PI)

या जागांसाठी अर्ज कसा करावा?
- IOCL भरती वेबसाइटला भेट द्या आणि ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून ऑनलाइन पोर्टलवर आपली नोंदणी करा.
- ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन ऑनलाइन अर्ज भरा.
- अर्ज भरल्यानंतर, ऑनलाइन अर्जाचे पीडीएफ फॉरमॅट भविष्यातील संदर्भासाठी, काही असल्यास त्यांच्या सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवा.

Web Title: IOCL Recruitment 2022 : apply for engineers graduate apprentice engineer posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.