इंडियन ऑइलमध्ये ज्युनियर ऑपरेटरसह अनेक पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:50 IST2025-02-11T14:49:48+5:302025-02-11T14:50:18+5:30

IOCL Recruitment 2025 : या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू आहे. 

IOCL Recruitment 2025 apply for 246 post know Eligibility Criteria Selection Process | इंडियन ऑइलमध्ये ज्युनियर ऑपरेटरसह अनेक पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज

इंडियन ऑइलमध्ये ज्युनियर ऑपरेटरसह अनेक पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज

IOCL Recruitment 2025 : बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) ज्युनियर ऑपरेटर आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू आहे. 

इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट देऊन २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. कंपनीने एकूण २४६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांमध्ये ज्युनियर ऑपरेटरची २१५ पदे, ज्युनियर अटेंडंटची २३ पदे आणि ज्युनियर बिझनेस असिस्टंटची ८ पदांचा समवेश आहे. 

ज्युनियर ऑपरेटर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे. याचबरोबर, ज्युनियर अटेंडंट पदासाठी अर्जदार १२वी पास असला पाहिजे. तर ज्युनियर बिझनेस असिस्टंट पदासाठी उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच, पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही जारी केलेली अधिसूचना तपासू शकता.

वयोमर्यादा किती असावी?
अर्जदाराचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. कमाल वयाच्या मर्यादेत ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. वयाची गणना ३१ जानेवारी २०२५ पासून केली जाईल.

अर्जाचे शुल्क किती?
जनरल आणि ओबीसी कॅटगरीतील अर्जदारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागतील. तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. उमेदवार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस इत्यादीद्वारे शुल्क भरू शकतात.

अशा प्रकारे करू शकता अर्ज... 
- आयओसीएलची अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट द्या.
- वेबसाइटवरील होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबवर जा.
- याठिकाणी अप्लाय लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्ट्रेश करा आणि फॉर्म भरा.
- डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि फी भरून फॉर्म सबमिट करा.

कशी होईल निवड?
अर्जदारांची निवड सीबीटी परीक्षा, स्किल टेस्ट इत्यादींद्वारे केली जाईल. परीक्षेचा पॅटर्न अधिसूचनेसह जारी करण्यात आला आहे. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Web Title: IOCL Recruitment 2025 apply for 246 post know Eligibility Criteria Selection Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी