पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी! IPRCLमध्ये मेगा भरती; २ लाखांवर पगार, अर्जाची शेवटची तारीख काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 04:09 PM2022-08-24T16:09:42+5:302022-08-24T16:11:56+5:30
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी मिळणार असून, सविस्तर माहिती जाणून घ्या...
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून खासगीसह सरकारच्या अनेक विभागांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पदवीधरांसाठी इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Port Rail & Ropeway Corporation Limited) येथे विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून, पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सीजीएम (ऑपरेशन्स आणि BD), जेजीएम (प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट समन्वय), जेजीएम (लोको)/डीजीएम(लोको)/ सिनीअर मॅनेजर (लोको), जेजीएम (अकाऊंट ॲण्ड टॅक्स)/ DGM (लेखा आणि कर), सिनीअर मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंट/मॅनेजर (वित्त आणि लेखा), सिनीअर मॅनेजर (सिव्हिल)/मॅनेजर (सिव्हिल)/डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल), मॅनेजर (रोपवे तज्ज्ञ), मॅनेजर (राजभाषा), डायरेक्टर (परिवहन आणि व्यवसाय विकास) या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान, ९ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, चौथा मजला, निर्माण भवन, एम.पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई-४०००१० या पत्त्यावर पाठवायचा आहे. नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.