१०वी पास आहात? ISRO मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; ६९ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:10 PM2023-12-10T17:10:52+5:302023-12-10T17:14:32+5:30

ISRO Recruitment 2023: इस्रोसोबत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या...

isro recruitment 2023 vacancies for technician b 54 posts job know about last date for application and full details | १०वी पास आहात? ISRO मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; ६९ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख काय? 

१०वी पास आहात? ISRO मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; ६९ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख काय? 

ISRO Recruitment 2023: गेल्या काही दिवसांपासून इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा जगात बोलबाला आहे. चंद्रयान ३ मोहीम यशस्वी केल्यानंतर इस्रोचे महत्त्व जगभरात वाढले आहे. तसेच आदित्य एल १ ने अलीकडेच एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. देशभरातून इस्रोचे कौतुक केले जात आहे. या सरकारी संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. १० इयत्ता उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी इस्रोमध्ये भरती करण्यात येत आहे. कोणत्या जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? अन्य डिटेल्स जाणून घेऊया...

इस्रोने टेक्निशियन-बी पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असणे गरजेचे आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा असणे आवश्यक आहे. हा डिप्लोमा NCVT द्वारे मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे. इस्रोच्या या भरती राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरसाठी आहेत. पात्रेसंबंधित इतर तपशील तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सूचनेवरून तपासू शकता.

पद, पगार आणि अर्ज शुल्क किती भरावे लागेल?

या भरतीसाठी तुम्हाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. परंतु परीक्षेनंतर SC/ST/PH/महिला उमेदवारांना संपूर्ण रक्कम परत केली जाईल. तर इतर उमेदवारांना CBT परीक्षेनंतर ४०० रुपये परत केले जातील. या पदांवर निवड झाल्यास, उमेदवारांना २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये मासिक वेतन मिळेल. यासोबतच केंद्र सरकारच्या नियमांनुसार अनेक भत्तेही दिले जाणार आहेत. पदानुसार पगाराची श्रेणी बदलू शकते. सर्व तपशील जाणून घेण्यासाठी वेबसाइटवर दिलेली सूचना तपासणे चांगले होईल आणि त्यानंतरच अर्ज करा.

दरम्यान, या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. एकूण ५४ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ०९ डिसेंबर २०२३ पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. 


 

Web Title: isro recruitment 2023 vacancies for technician b 54 posts job know about last date for application and full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.