सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'ITBP'मध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:59 PM2022-08-22T12:59:57+5:302022-08-22T13:00:25+5:30

Sarkari Naukri 2022 : इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (पायनियर) पदासाठी अर्ज मागवले आहेत. 

itbp invites application for constable pioneer of 108 post | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'ITBP'मध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'ITBP'मध्ये विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर...

Next

नवी दिल्ली : तुम्ही जर 10 वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल (पायनियर) पदासाठी अर्ज मागवले आहेत. 

आयटीबीपीने कॉन्स्टेबलच्या (पायनियर)  108 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी 56 कॉन्स्टेबल (कारपेंटर), 31 कॉन्स्टेबल (मेसन) आणि 21 कॉन्स्टेबल (प्लंबर) पदांचा समावेश आहे.

आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल (पायनियर) पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयटीबीपीच्या recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटवर 17 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (पायनियर) पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 10वी पास असावा. याशिवाय, उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयमधून मेसन, कारपेंटर किंवा प्लंबरचा एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स केलेला असावा. या पदांच्या भरतीसाठी अर्जदारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे.

100 रुपये अर्ज शुल्क
मेसन, कारपेंटर आणि प्लंबरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, जनरल /ओबीसी / ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. या पदांवरील निवड शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीच्या आधारे केली जाईल.

ऑनलाइन करा अर्ज
या पदांसाठी भरतीसाठी पहिल्यांदा आयटीबीपीच्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फी भरा आणि फॉर्मची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

Web Title: itbp invites application for constable pioneer of 108 post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.