JOB Alert : गुड न्यूज! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती, 1,40,000 पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 02:57 PM2022-12-10T14:57:49+5:302022-12-10T15:11:38+5:30

AAI Recruitment 2022 : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (AAI Recruitment 2022) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

JOB Alert AAI Recruitment 2022 golden chance to get job in aai without exam check qualifications salary | JOB Alert : गुड न्यूज! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती, 1,40,000 पगार

JOB Alert : गुड न्यूज! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती, 1,40,000 पगार

googlenewsNext

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (AAI Recruitment 2022) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इंजिनिअरिंग-सिविल, इंजिनिअरिंग-इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आर्किटेक्चर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी इच्छूक असलेले उमेदवार AAI ची अधिकृत वेबसाईट aai.aero वर जाऊन अप्लाय करू शकतात. 

https://www.aai.aero/ या लिंकवर जाऊन देखील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 596 पदांची भरती करण्यात येणार आहे. 22 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. 21 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्याआधी अप्लाय करा. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय नियुक्ती होणार आहे. 

'या' पदांसाठी भरती

ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इंजिनिअरिंग- सिविल) - 62
ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इंजिनिअरिंग- इलेक्ट्रिकल) - 84
ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) - 440
ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (आर्किटेक्चर) -10
एकूण - 596 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इंजिनिअरिंग- सिविल)– सिविलमध्ये इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीची पदवी असणे आवश्यक आहे.

ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इंजिनिअरिंग- इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकलमधील इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजीची पदवी असणे आवश्यक आहे.

ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रिकलमधील इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे.

ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (आर्किटेक्चर) – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली पाहिजे आणि आर्किटेक्ट ऑफ आर्किटेक्टमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

21 जानेवारी 2022 पर्यंत 27 वर्षे वय असावं.

पगार

ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह - 40,000 ते 1,40,000 रुपये. 
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: JOB Alert AAI Recruitment 2022 golden chance to get job in aai without exam check qualifications salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.