JOB Alert : अरे व्वा! Airports Authority of India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय नियुक्ती, 1 लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:57 AM2022-04-11T10:57:13+5:302022-04-11T11:06:07+5:30
Airports Authority of India : पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय विमान प्राधिकरणामध्ये (Airports Authority of India, AAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. एअरपोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
उमेदवारांना अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. एअरपोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियाच्या भूमि प्रबंधन आणि अग्निशमन विभागामध्ये कन्सल्टंट आणि ज्युनिअर कन्सल्टंटची 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
भूमि प्रबंधन - या पदासाठी 29 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अग्निशमन विभागामध्ये कन्सल्टंट - या पदासाठी 28 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.
पगार
- कंसल्टंट या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
- ज्युनिअर कन्सल्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.