JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:24 PM2021-08-16T12:24:21+5:302021-09-25T15:21:42+5:30
AIL Recruitment 2021: एअर इंडिया लिमिटेडमध्ये (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. एअर इंडिया लिमिटेडमध्ये (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे. एअर इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या माहितीनुसार एकूण 30 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट airidia.in ला भेट देणं आवश्यक आहे.
उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आल्यानं उमेदवारांनी तातडीनं अर्ज दाखल करण आवश्यक आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.
जागा
बीपीओ टीम लीडर – 1
मॅनेजर (ट्रेड सेल्स) – 1
ऑफिसर / एएम सेल्स (सेल्स सपोर्ट अँड मार्केट एनालिस्ट) – 1
ऑफिसर / एएम (कस्टमर ग्रीवांस) -1
असिस्टेंट मॅनेजर/ डिप्टी मॅनेजर/ मॅनेजर – 5
स्टेशन मॅनेजर (रेस्ट ऑफ इंडिया) – 14
एजीएम (आयओसीसी) – 1
आयटी हेड – 1
एजीएम (मेडिकल सर्विस) – 1
सीनियर सुपरवायजर (मेडिकल) – 1
ग्राउंड इंस्ट्रक्टर – 3
AAI Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?#Job#JOBAlert#AAIRecruitment2021https://t.co/E7c4n58yzJ
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021
पात्रता
- बीपीओ टीम लीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
- आयटी प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक किंवा MCA पदवी असणे आवश्यक आहे.
- एजीएम (वैद्यकीय सेवा) पदासाठी, उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा?
एअर इंडियामधील रिक्त पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करावा. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्जातील माहिती भरून अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली-110037 वर स्पीड पोस्टाद्वारे पाठवणं आवश्यक असेल.
निवड प्रक्रिया
मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी एअर इंडियाकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
JOB Alert : खूशखबर! 34,000 रुपये पगार मिळणार; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#JobAlert#bank#IDBIBankRecruitment2021https://t.co/WNsaYbUz6V
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2021