JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न घेता होईल निवड, मिळणार 50 हजार पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:29 PM2022-05-26T14:29:20+5:302022-05-26T14:39:13+5:30
Air India Recruitment 2022 : Air India मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. Air India मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. Air India Airport Services Limited (AIASL) ने मॅनेजर ऑफ फायनान्स, ऑफिसर अकाउंट्स आणि असिस्टंट ऑन अकाउंट्स (Air India Recruitment 2022) ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एअर इंडियाची अधिकृत वेबसाईट, airindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://www.airindia.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (एअर इंडिया रिक्रूटमेंट 2022) थेट अर्ज करू शकतात. तसेच http://www.aiasl.in/resources/Finance%20Advertisement.pdf या लिंकद्वारे, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकता. या भरती (Air India Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 7 पदे भरली जातील.
महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मे 2022
जागा
मॅनेजर फायनान्स - 3
ऑफिसर अकाऊंट - 2
असिस्टेंट अकाऊंट - 2
पात्रता
मॅनेजर-फायनान्स – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे चार्टर्ड अकाउंटंट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे कॉस्ट अकाउंटंट. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे सदस्य किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य किंवा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या नामांकित विद्यापीठातून फायनान्लमध्ये एमबीए.
ऑफिसर अकाउंट्स - इंटर चार्टर्ड अकाऊंटंट / इंटर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी किंवा फायनान्समध्ये एमबीए.
असिस्टंट अकाऊंट - मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीधर (ऑनर्स). तसेच, 1 वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
मॅनेजर फायनान्स - 30 वर्षांपेक्षा जास्त नाही
ऑफिसर अकाऊंट
सामान्य - 30 वर्षांपेक्षा जास्त नाही
OBC: 33 वर्षांपेक्षा जास्त नाही
SC/ST: 35 वर्षांपेक्षा जास्त नाही
असिस्टंट अकाऊंट
सामान्य - 28 वर्षांपेक्षा जास्त नाही
OBC - 31 वर्षांपेक्षा जास्त नाही
SC/ST - 33 वर्षांपेक्षा जास्त नाही
पगार
मॅनेजर फायनान्स - रु. 50,000/- दरमहा
ऑफिसर अकाऊंट - रु. 41,000/- दरमहा
असिस्टंट अकाऊंट – रु. 19,350/- दरमहा
निवड प्रक्रिया
निवडलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.