JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत भरती, मिळणार तब्बल 1 लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 05:42 PM2021-12-01T17:42:45+5:302021-12-01T17:57:05+5:30
Bank Jobs 2021: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. बँकेतनोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती आहे. या पदभरती अंतर्गत जनरल ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी धारक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. सेंट्रल बँकेतर्फे एसओ व्हॅकेन्सी 2021 नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
जागा
इकोनॉमिस्ट – 01
इनकम टॅक्स ऑफिसर – 01
इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (स्केल 5) – 01
डाटा सायंटिस्ट – 01
क्रेडिट ऑफिसर – 10
डाटा इंजिनियर – 11
आईटी सिक्योरिटी एनालिस्ट – 01
IT SOC एनालिस्ट – 02
रिस्क मॅनेजर (स्केल 3) – 05
टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) – 05
फाइनान्शियल एनालिस्ट – 20
इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (स्केल 2) – 15
लॉ ऑफिसर – 20
रिस्क मॅनेजर (स्केल 2) – 10
सिक्योरिटी (स्केल 2) – 03
सिक्योरिटी (स्केल 1) – 09
एकूण पदांची संख्या – 115
निवड प्रक्रिया
ऑनलाईन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षा एक तासाची असेल.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021
लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड - 11 जानेवारी 2022 पासून
लेखी परीक्षेची तारीख (तात्पुरती) – 22 जानेवारी 2022
पात्रता
सेंट्रल बँकेतर्फे विविध विभागांमध्ये एसओ पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक विभाग आणि स्केलसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहेत. नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पगार
स्केल 1 - 36 हजार ते 63,840 रुपये प्रति महिना
स्केल 2 - 48,170 ते 69,810 रुपये प्रति महिना
स्केल 3 - 63,480 ते 78,230 रुपये प्रति महिना
स्केल 4 - 76,010 ते 89,890 रुपये प्रति महिना
स्केल 5 - 89,890 ते 1,00,350 रुपये प्रति महिना
असा भरा अर्ज
या पदासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाची वेबसाईट, Centralbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये आणि इतर सर्व श्रेणींसाठी 850 रुपये शुल्क भरावे लागेल. या शुल्कासोबतच 18 टक्के जीएसटी वेगळा भरावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.