Job Alert: सीआरपीएफमध्ये बंपर भरती, दहावी पास, आयटीआयसाठी नोकरीची सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:08 PM2023-03-16T12:08:09+5:302023-03-16T12:08:40+5:30
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) मध्ये बंपर भरती निघाली आहे. टेक्निकल आणि ट्रेड्समन अशी ही पदे आहेत. पुरुष आणि महिला उमेदवारांच्या ९००० हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी फॉर्मही सुटले असून २७ मार्चपासून अर्ज करता येणार आहेत. यासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
CRPF Constable Recruitment 2023 ही भरती पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगढ़ सेक्टरसाठी होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
रिक्त जागा तपशील
कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) च्या एकूण पदांची संख्या – 9212
पुरुष – 9105 रिक्त जागा
महिला – 107 जागा
CRPF कॉन्स्टेबल पगार
उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.
महत्वाच्या तारखा
CRPF कॉन्स्टेबलसाठी अर्ज करण्याची तारीख - 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2023
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - 20 जून ते 25 जून 2023 दरम्यान
परीक्षेची तारीख - 01 जुलै ते 13 जुलै 2023 दरम्यान
CRPF कॉन्स्टेबल अर्ज फी
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील. तसेच SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
पात्रता...
सीटी/ड्रायव्हर - मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता:
मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.
अर्ज, जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...