Job Alert: आयटी क्षेत्रात फ्रेशर्सना पुढील वर्षी उत्तम संधी; चांगले पॅकेजही मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:04 IST2024-12-12T08:03:37+5:302024-12-12T08:04:18+5:30

भरतीत २० टक्के वाढ, एआय, मशिन लर्निंग, डाटा ॲनालिटिक्स जाणकारांना मिळेल चांगले पॅकेज

Job Alert: Great opportunity for freshers in IT field next year | Job Alert: आयटी क्षेत्रात फ्रेशर्सना पुढील वर्षी उत्तम संधी; चांगले पॅकेजही मिळणार...

Job Alert: आयटी क्षेत्रात फ्रेशर्सना पुढील वर्षी उत्तम संधी; चांगले पॅकेजही मिळणार...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कर्मचारी भरतीत १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. टॅलेंट सोल्युशन्स कंपनी ‘एनएलबी सर्व्हिसेस’ने जारी केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालात म्हटले आहे की, आयटी उद्योगाने २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत पुन्हा गती पकडली आहे. त्यामुळे हे क्षेत्र २०२५ साठी अधिक चांगल्या कामगिरीसाठी सज्ज झाले आहे. 

या कर्मचाऱ्यांना अधिक संधी
एआय, मशीन लर्निंग, डाटा ॲनालिटिक्स आणि क्लाउड सहित विशिष्ट तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्यांत ३० ते ३५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पात्रता असलेल्या नवीन पदवीधरांना अधिक संधी उपलब्ध होतील.

कौशल्य वाढणार 
आगामी वर्षात कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासातही कंपन्यांकडून वाढ केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत करण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

कर्मचारी कपात मंदावणार
अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये जागतिक मंदीमुळे कंपन्यांना विभिन्न आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू केली होती. २०२५ मध्ये कर्मचारी कपातीची गती घटेल. त्यामुळे नवीन पदवीधरांच्या अपेक्षा वाढतील

Web Title: Job Alert: Great opportunity for freshers in IT field next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी