JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये 'या' पदांवर भरती; जाणून घ्या, कुठे करायचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 03:02 PM2022-03-05T15:02:00+5:302022-03-05T15:11:54+5:30
Hindustan Shipyard Recruitment 2022: एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण 40 जागांसाठी भरती होणार आहेत.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Limited, HSL) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण 40 जागांसाठी भरती होणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल आहे.
अर्ज कुठे, कसा करायचा?
- एचएसएल भरती 2022 साठी अर्ज करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट hslvizag.in वरील करिअर विभागावर क्लिक करावं.
- संबंधित भरती नोटिफिकेशन डाउनलोड लिंक आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
- या लिंकद्वारे अर्जाच्या पेजवर जा.
- संबंधित पदाच्या अर्ज लिंकवर क्लिक करून आणि सर्व तपशील भरा.
जागा - 40
जनरल मॅनेजर (एचआर) – 1 पद
डिप्टी जनरल मॅनेजर (फायनान्स) – 1 पद
डिप्टी जनरल मॅनेजर (टेक्निकल) – 2 पद
मॅनेजर (टेक्निकल) – 7 पद
मॅनेजर (कमर्शियल) – 2 पद
असिस्टेंट मॅनेजर (फायनान्स) – 1 पद
प्रोजेक्ट ऑफिसर (टेक्निकल) – 4 पद
प्रोजेक्ट ऑफिसर (एचआर) – 1 पद
डिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (प्लांट मेंटेनेंस) – 2 पद
डिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (सिविल) – 2 पद
डिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (टेक्निकल) – 10 पद
डिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (आयटी अँड ईआरपी) – 2 पद
डिप्टी प्रोजेक्ट ऑफिसर (एचआर) – 2 पद
सीनियर कंसल्टेंट (टेक्निकल) – दिल्ली ऑफिस – 1 पद
सीनियर कंसल्टेंट (ईकेएम सबमरीन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड आउटसोर्सिंग)– 1 पद
कंसल्टेंट (एडमिनिस्ट्रेशन) – दिल्ली ऑफिस – 1 पद
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.