JOB Alert : मस्तच! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत 920 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:21 PM2021-08-04T15:21:59+5:302021-09-25T15:18:42+5:30
IDBI Bank Recruitment 2021 : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे. तसेच उमेदवारांचं वय हे 20 ते 25 वर्षांदरम्यान असणं गरजेचं आहे.
नवी दिल्ली - बँकेतनोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. IDBI बँक (Industrial Development Bank of India) मध्ये लवकरच मेगाभरती (IDBI Bank Recruitment 2021) होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे. तसेच उमेदवारांचं वय हे 20 ते 25 वर्षांदरम्यान असणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 4 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2021
जागा
एकूण जागा - 920
शैक्षणिक पात्रता
- पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे.
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे.
JOB Alert : खूशखबर! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कधी करायचा अर्ज?#job#JobAlert#India#Engineerhttps://t.co/JRdKlUba0U
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार यांचं वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
पगार
पहिलं वर्ष - 29,000 रुपये प्रतिमहिना
दुसरं वर्ष - 31,000 रुपये प्रतिमहिना
तिसरं वर्ष - 34,000 रुपये प्रतिमहिना
शुल्क
SC/ST/PWD – रु. 200
इतर उमेदवारांसाठी - रु. 1000
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/IDBI-Bank-Recruitment-2021.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता. तसेच https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
PGCIL Apprentice Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज?#PGCILApprenticeRecruitment2021#job#JobSearch#JobAlerthttps://t.co/sFCtzBuexV
— Lokmat (@MiLOKMAT) July 20, 2021