JOB Alert : गुड न्यूज! 8 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्टात भरती, मिळणार 60 हजार पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:40 PM2022-09-21T14:40:21+5:302022-09-21T14:45:26+5:30

India Post Recruitment 2022: इंडिया पोस्टमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती आहे. या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रीशियन, पेंटर, वेल्डर आणि कारपेंटर यांची रिक्त पदे भरली जातील.

JOB Alert india post recruitment 2022 out for group c posts check all details here | JOB Alert : गुड न्यूज! 8 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्टात भरती, मिळणार 60 हजार पगार

JOB Alert : गुड न्यूज! 8 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्टात भरती, मिळणार 60 हजार पगार

googlenewsNext

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इंडिया पोस्टमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती आहे (India Post Recruitment 2022). या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रीशियन, पेंटर, वेल्डर आणि कारपेंटर यांची रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने पाठवावेत. 17 ऑक्टोबरपर्यंत हे पाठवणं आवश्यक आहे

एकूण पदं - 7

एमवी मॅकेनिक - 1 पद
एमवी इलेक्ट्रीशियन - 2 पद
पेंटर - 1 पद
वेल्डर - 1 पद
कारपेंटर - 2 पद

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच, एखाद्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास, तो देखील भरतीसाठी अर्ज करू शकतो. यासोबतच एमपी मेकॅनिक पदांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना ट्रेड टेस्टमधून जावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: JOB Alert india post recruitment 2022 out for group c posts check all details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.