JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:23 PM2022-01-17T18:23:33+5:302022-01-17T18:49:13+5:30

Indian Oil Corporation Limited : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली येथील विविध ठिकाणी एकूण 570 जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

JOB Alert indian oil recruitment 2022 570 vacancies in maharashtra gujarat and other states check details | JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे तब्बल 570 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. टेक्निकल (Technical) आणि नॉन- टेक्निकल अप्रेंटिस पोस्ट (Non-technical apprentice posts) वर भरती होत आहे. पात्र उमेदवारांना iocl.com या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली येथील विविध ठिकाणी एकूण 570 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षे असावे.

महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022

कोणत्या राज्यात किती जागा

महाराष्ट्र – 212 
गुजरात- 61 
छत्तीसगड – 22 
गोवा – 3 
मध्य प्रदेश – 40 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

टेक्निकल अप्रेन्टिस  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics आणि Electronics या शाखांमधील डिप्लोमा पूर्ण उमेदवारांना यासाठी अप्लाय करता येणार आहे. तसेच काही जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: JOB Alert indian oil recruitment 2022 570 vacancies in maharashtra gujarat and other states check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी