JOB Alert : गुड न्यूज! 12 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कसा, कुठे, कधी करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 09:14 AM2022-12-14T09:14:25+5:302022-12-14T09:23:43+5:30
JOB Alert : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. दक्षिण रेल्वेकडून वेगवेगळी स्पोर्टस कोट्यातील पदं भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छूक आणि योग्य उमेदवार दक्षिण रेल्वे आरआरसीची अधिकृत वेबसाईटने rrcmas.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 जानेवारी आहे.
'अशी' होणार भरती
VII CPC पे मॅट्रिक्सचा लेव्हल 4/5: 5 जागा
VII CPC पे मॅट्रिक्सचा लेव्हल 2/3: 16 जागा
एकूण - 21
पात्रता
लेव्हल 2/3 पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी असणे अनिवार्य आहे.
4/5 च्या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे. त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठकडची पदवी असणं आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा
वरील पदांसाठी 3 डिंसेबरपासून अर्ज करणे सुरू आहे, ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी 2 जानेवारीपुर्वी अर्ज दाखल करावा. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू काश्मीर, लाहौल, स्पिती जिल्हे आणि हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटे आणि परदेशात राहणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे.
शुल्क
रेल्वे भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 250 शुल्क आहे, तर इतर उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आहे.
पगार
लेव्हल 2 - 19,900 रुपये
लेव्हल 3 - 21,700 रुपये
लेव्हल 4 - 25,500 रुपये
लेव्हल 5 - 29,200 रुपये
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"