JOB Alert : मस्तच! गुप्तचर विभागात तब्बल 527 पदांवर भरती; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:06 PM2021-08-25T17:06:37+5:302021-08-25T17:16:10+5:30

JOB Alert Intelligence Bureau Recruitment 2021: गुप्तचर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल 527 पदांसाठी भरती होणार आहे.

JOB Alert Intelligence Bureau Recruitment 2021: Vacancy For 527 Posts | JOB Alert : मस्तच! गुप्तचर विभागात तब्बल 527 पदांवर भरती; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?

JOB Alert : मस्तच! गुप्तचर विभागात तब्बल 527 पदांवर भरती; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. गुप्तचर विभागात (Intelligence Bureau Recruitment 2021) काम करण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल 527 पदांसाठी भरती होणार आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रिसर्च ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंटंट, सुरक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, केअरटेकर यासह इतर पदावर भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

विविध पदानुसार ,दहावी, बारावी, पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

विविध पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयोमर्यादा 56 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. 

एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

पदांचा तपशील

उपसंचालक - 2
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर - 10
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - 168
सीनियर रिसर्च ऑफिसर - 02
रिसर्च असिस्टंट - 2
सिनिअर फॉरेन लँग्वेज - 1
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर - 2
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव्ह - 56
असिस्टंट ज्युनिअर इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह - 96
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - 13
पर्सनल असिस्टंट: 02
अकाऊंट ऑफिसर: 03
अकाउंटंट: 24
सिक्युरिटी ऑफिसर - 08
असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर - 12
असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल) - 10
फिमेल स्टाफ नर्स - 01
ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर - 52
सिक्युरिटी असिस्टंट - 20
केअरटेकर - 05
हलवाई कुक - 11
मल्टी टास्किंग स्टाफ - 24
लायब्ररी अटेंडंट - 01

अर्ज कुठे करायचा?

गुप्तचर विभागाच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून सर्व माहिती भरून पोस्टानं पाठवायचा आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 21 ऑक्टोबर आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता?

जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली - 110021. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: JOB Alert Intelligence Bureau Recruitment 2021: Vacancy For 527 Posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.