JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 3093 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:30 PM2021-09-15T18:30:49+5:302021-09-15T18:36:40+5:30
Railway Recruitment 2021 : तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment 2021) येथे दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे. आरआरसीची अधिकृत वेबसाईट http://rrcnr.org/ वर अर्ज करता येणार आहे. एकूण 3093 जागांसाठी भरती होणार आहे.
JOB Alert : अरे व्वा! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; रेल्वेमध्ये भरती, जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#JobAlert#railwayhttps://t.co/qCiys4JjAD
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2021
पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
20 ऑक्टोबर 2021
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर डिव्हीजनमध्ये COPA, स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, टेक्निशियनसह वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
JOB Alert : नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#Job#JOBAlert#NuclearPowerCorporationhttps://t.co/YTgMMXc7vM
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2021
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती; असा करा अर्ज
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 339 अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. त्यामुळेच दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. ही भरती रेल्वेच्या विविध विभागांसाठी आहे. 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
पदांची नावं
वेल्डर
सुतार
फिटर
इलेक्ट्रीशियन
स्टेनो
वायरमन
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
मेकॅनिक डिझेल
JOB Alert : Intelligence Bureau मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; असा करा अर्ज#Job#JOBAlert#IntelligenceBureauRecruitment2021https://t.co/Gi11om6Ira
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021