JOB Alert : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये मोठी भरती, 1.40 लाख पगार; आजच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:32 PM2021-08-02T12:32:05+5:302021-09-25T15:18:22+5:30
Rail India Technical and Economic Service : सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये (Rail India Technical and Economic Service) इंजिनिअर्ससाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 25 ऑगस्ट 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
'या' पदांसाठी भरती
इंजिनिअर (Civil) - 25
इंजिनिअर (Mechanical) - 15
इंजिनिअर (Electrical) - 08
एकूण जागा - 48
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इंजिनिअर (Civil) - BE/ B.Tech/ BSc Engg. (Civil) आणि 2 वर्षांचा अनुभव
इंजिनिअर (Mechanical) - BE/ B.Tech/ BSc Engg.(Mechanical) आणि 2 वर्षांचा अनुभव
इंजिनिअर (Electrical) - BE/ B.Tech/ BSc Engg. (Electrical) आणि 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा
18 ते 32 वर्षे
पगार
इंजिनिअर (Civil), इंजिनिअर (Mechanical), इंजिनिअर (Electrical) पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये पगार देण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
GAIL Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' पदांसाठी होणार मोठी भरती#job#JobAlert#GAILRecruitment2021https://t.co/tOCTrYQzdP
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2021