JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदासाठी भरती, मिळणार 1.80 लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 18:59 IST2022-11-20T18:42:31+5:302022-11-20T18:59:28+5:30
JOB Alert : सेल मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2022 नोटिफिकेशननुसार, या भरतीप्रक्रियेमध्ये विविध ट्रेड्समध्ये एकूण 245 जागा भरण्यात येणार आहे.

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 'या' पदासाठी भरती, मिळणार 1.80 लाख पगार
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मध्ये भरती करण्यात येणार आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवार सेलची अधिकृत वेबसाईट sail.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
सेल मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2022 नोटिफिकेशननुसार, या भरतीप्रक्रियेमध्ये विविध ट्रेड्समध्ये एकूण 245 जागा भरण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवार 23 नोव्हेंबर 2022 च्या आधी एप्लीकेशन फॉर्म भरू शकतात. यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. वॅकेन्सी डिटेल्स, एज्युकेशन एलिजिबिलिटी, एज लिमिट, सिलेक्शन प्रोसेससह महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
एकूण पदं - 245
मॅकेनिकल इंजिनिअरींग - 65
मॅटलर्जिकल इंजिनिअरींग - 52
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग - 59
केमिकल इंजिनिअरींग - 14
सिविल इंजिनिअरींग - 16
मायनिंग इंजिनिअरींग - 26
इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरींग -13
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून ट्रे़डमध्ये कमीत कमी 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंगची डिग्री असायला हवी. तसेच GATE 2022 क्वालीफाय असायला हवं.
वयोमर्यादा
उमेदवाराचं वय हे 28 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
निवड प्रक्रिया
उमेदवारांना GATE 2022 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट करण्यात येईल. तसेच सिलेक्शनसाठी उमेदवारांना लिखित परीक्षा, जीडी आणि इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"