JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 03:13 PM2022-10-25T15:13:56+5:302022-10-25T15:19:52+5:30

SBI Recruitment 2022 : नोकरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

JOB Alert sbi recruitment 2022 registration begins for recruitment to 1422 posts in sbi | JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

googlenewsNext

नोकरीच्य़ा शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये अनेक पदांसाठी भरती आहे. ही भरती सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBOs) साठी 1400 नियमित आणि 22 बॅकलॉग पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in किंवा ibpsonline.ibps.in वर अर्ज करू शकतात.

नोकरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. 4 डिसेंबर 2022 रोजी यासंबंधी परीक्षा होणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना सूचना वाचून अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (UG) असणे आवश्यक आहे. यासह, इंटीग्रेटेड डुअल डिग्री (IDD) आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारख्या पात्रता देखील स्वीकारल्या जातील.

जागा

आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांसाठी सर्वाधिक 300 पदे आहेत. यानंतर, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी 212 पदे, राजस्थानसाठी 201, तेलंगणासाठी 176 आणि ओडिशा आणि पश्चिम बंगाल/सिक्कीम/अंदमान आणि निकोबार बेटांसाठी 175-175 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: JOB Alert sbi recruitment 2022 registration begins for recruitment to 1422 posts in sbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.