नोकरी, करिअर, सबकुछ! करिअर कसे निवडावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 07:59 AM2023-05-07T07:59:40+5:302023-05-07T08:01:14+5:30

योग्य प्रकारे करिअर निवडले, तर जीवनात निश्चितच यश मिळते आणि पश्चात्तापाची वेळ येत नाही. तर योग्य प्रकारे करिअर कसे निवडावे, हे आज आपण पाहू

Job, career, everything | नोकरी, करिअर, सबकुछ! करिअर कसे निवडावे?

नोकरी, करिअर, सबकुछ! करिअर कसे निवडावे?

googlenewsNext

योग्य प्रकारे करिअर निवडले, तर जीवनात निश्चितच यश मिळते आणि पश्चात्तापाची वेळ येत नाही. तर योग्य प्रकारे करिअर कसे निवडावे, हे आज आपण पाहू

आपले उद्दिष्ट ठरवा : करिअर निवडण्यापूर्वी काही प्रश्न स्वत:ला विचारावेत. मला यातून काय हवे आहे? माझी तत्त्वे कोणती आहेत? मला सर्वाधिक आनंद कोणता व्यवसाय किंवा नोकरीत मिळू शकतो? माझ्या आवडी काय आहेत? माझी बलस्थाने व योग्यता काय आहेत? आपल्याला तांत्रिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत, की व्यवस्थापनात भूमिका बजावायची आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदा मिळाली की, करिअरचा मार्ग मोकळा होतो.

पाच आणि दहा वर्षांची योजना तयार करा : करिअरचा निश्चित मार्ग ठरल्यावर टप्पे ठरवून घ्या. इतर लोक त्यांच्या कारकिर्दीत ५ किंवा १० वर्षांत कुठे आहेत, याचा अभ्यास करा. भविष्यात पाच किंवा दहा वर्षांत तुम्हाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या घ्यायला आवडेल आणि त्यासाठी कोणकोणती कौशल्ये लागतील, याचा अभ्यास करा व तशी तयारी करा.

आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे गांभीर्याने पाहा : तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसा प्रतिसाद देता, यावर लक्ष केंद्रित करा. यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेऊन करिअर निवडता येते. अनेक चाचण्यांमध्ये दोन करिअर समोर आले तर त्यावर विचार करू शकता.

मागील अनुभवाचे पुनरावलोकन करा : करिअर निवडताना तुमची कामे आणि त्यात तुमचे समाधान फार महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येकाला कळून येते की, आपल्याला नेमके समाधान कशात मिळते व आपले कौशल्य कशात आहे. त्याचेच पुनरावलोकन करणे गरजेचे आहे.

पात्रता आणि शिक्षणाची तुलना करा : अनेक नोकऱ्यांमध्ये उमेदवारांना विशिष्ट शैक्षणिक पात्रता गरजेची असते. काही ठिकाणी हायस्कूल डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर शिक्षण गरजेचे असते. आपल्या आवडीची नोकरी आणि शैक्षणिक पात्रता यांचा मेळ बसतो का, हे पाहा.

आपल्या कौशल्यांचे मूल्यांकन करा : तुमच्याकडे असलेली कौशल्ये, प्रमाणपत्रे व बलस्थाने असलेल्या क्षेत्रांची यादी करा. आपल्यातील कमी-जास्त कौशल्यांबद्दल आपण सहकारी, मित्र यांना विचारू शकता. हे मूल्यांकन तुम्हाला योग्य करिअर शोधण्यात मदत करू शकते.

आपल्या पगाराची गरज लक्षात घ्या : आपल्याला किती पगार हवा आहे, या करिअरमध्ये तेवढा मिळतो का, हे पाहावे लागेल. एखाद्या ठिकाणी पगार आकर्षक असेल आणि समाधानकारक नोकरी नसेल, तर त्याचाही गांभीर्याने विचार करा.

आवड : आपल्याला सर्वांत जास्त रूची कशात आहे, हे तपासा. त्यानुसार करिअर निवडा म्हणजे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. लॉजिक पझल्स आवडत असतील तर ते सायबर सिक्युरिटीमध्ये जाऊ शकतात. ट्रॅव्हलिंगची आवड असेल तर अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.   

संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक

Web Title: Job, career, everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.