नोकरी, करिअर, सबकुछ : नोकरकपातीच्या वादळात जॉब वाचवायचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 08:32 AM2023-05-28T08:32:13+5:302023-05-28T08:32:42+5:30

२०२३च्या पाच महिन्यांत अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली. या वादळातून आपली नोकरी सुरक्षित ठेवायची असल्यास हे सहा मार्ग अंगीकारा...

Job Career Everything How to save a job in the storm of job cuts know everything you want to know | नोकरी, करिअर, सबकुछ : नोकरकपातीच्या वादळात जॉब वाचवायचा कसा?

नोकरी, करिअर, सबकुछ : नोकरकपातीच्या वादळात जॉब वाचवायचा कसा?

googlenewsNext

ऑफर लेटर काळजीपूर्वक वाचा : कोणत्याही नोकरीवर जॉइन होण्यापूर्वी ऑफर लेटरमधील तपशील बारकाईने वाचा. आपण प्रदीर्घ काळासाठी कंपनीत थांबण्याची गरज त्यात कळून येईल. एखादे कलम कळाले नाही तर एचआरशी संपर्क साधा.

नोटीस कालावधी जास्तीचा हवा : तुम्ही एखादे स्टार्टअप किंवा नवीन कंपनी जॉइन करीत असाल तर जास्त कालावधीच्या नोटीस कालावधीसाठी आग्रह धरा. एक महिन्याचा नोटीस कालावधी म्हणजे कंपनी शॉर्ट नोटीसवर काढू शकते. या कालावधीत अन्य एखादी नोकरी शोधणे अवघड असते. त्यामुळे नोटिशीसाठी जास्त कालावधीची तरतूद करून घ्या. यामुळे कंपनी व आपल्याला दोघांनाही पुरेसा कालावधी मिळतो.

लास्ट-इन-फर्स्ट-आऊट (लिफो)मधून सूट : कंपनीतून कुणाला काढण्याची वेळ आली तर अगदी अलीकडे कंपनीत जॉइन झालेल्यांचा बळी दिला जातो. यातून आपल्याला वगळण्याची अट ठेवावी. अगदीच शक्य न झाल्यास काही तरी पर्यायी व्यवस्था करण्यास सांगावे. याबाबत आग्रही असावे.

गोल्डन हँडशेक क्लॉज : आपली नोकरी वाचविण्यासाठी कंपनीला आपल्याकडे भरपूर व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यास सांगावे. गोल्डन हँडशेक क्लॉज म्हणजे आपल्याला नोकरीतून काढण्याची कंपनीवर वेळ आलीच तर काही रोख रक्कम, काही पर्याय आपल्या बाजूने असू द्यावा. याची तरतूद करणे अत्यावश्यक आहे.

नॉन-कॉम्पिट क्लॉज : सध्या तुम्ही ज्या कंपनीत काम करीत असाल, त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनीत न जाण्यासाठीचे हे बंधन असते. ते आपल्यावर घालून घेणे टाळावे. अर्थात कंपन्या काही वर्षांच्या अनुभवानंतर हे बंधन उठवतात; परंतु, आपल्याकडून योग्यवेळी याची काळजी घेतलेली चांगली असते.

भरपाई : कोणत्याही कारणाशिवाय टर्मिनेशन हे कंपनीच्या ध्येयधोरणांचे उल्लंघन केले तरच केले जाऊ शकते; परंतु, कोणत्याही कारणाशिवाय टर्मिनेशन झाल्यास त्याची पुरेशी भरपाई मिळणे गरजेचे आहे. तीन महिन्यांची नोटीस किंवा तीन महिन्यांचा पगार, मिळण्यासाठी आग्रह धरावा.

Web Title: Job Career Everything How to save a job in the storm of job cuts know everything you want to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी