DRDO 2022: डीआरडीओमध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, हजारो जागांवर होणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 20:02 IST2022-08-26T20:02:21+5:302022-08-26T20:02:51+5:30
DRDO CEPTAM Recruitment 2022: पाहा कुठे आणि कसा करता येईल अर्ज. जाणून घ्या किती असेल वेतन.

DRDO 2022: डीआरडीओमध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, हजारो जागांवर होणार भरती
DRDO CEPTAM Recruitment 2022: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. विज्ञान, अभियांत्रिकी पदवीधर आणि आयटीआय उत्तीर्ण युवक यासाठी अर्ज करू शकतात. DRDO च्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंटने (CEPTAM) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदासाठी १९०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार ३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २३ सप्टेंबर आहे.
पद - सीनियर टेक्निकल असिस्टंट- B - १०७५ वेकन्सी
पात्रता - संबंधित ट्रेड/विषयामध्ये विज्ञान/अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा (कृषी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॉटनी, केमिकल इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, सिविल इंजिनिअरिंग, कंम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, लायब्ररी सायन्स, मॅथ्स, मेटलर्जी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, फोटोग्राफी, फिजिक्स, प्रिन्टिंग टेक्नॉलॉजी, सायकोलॉजी, टेक्स्टाईल्स, झुओलॉजी यांचा समावेश आहे.
कशी होईल निवड - टियर १ सीबीटी स्क्रिनिंग टेस्ट, टियर २ सीबीटी सिलेक्शन टेस्ट
पद - टेक्निशिअन - A ८२६ वेकन्सी
दहावी उत्तीर्ण आणि आयटीआयचा कोर्स केलेला असणे अनिवार्य आहे.
कशी होईल निवड - टियर १ सीबीटी सिलेक्शन टेस्ट, टियर २ ट्रेड स्किल टेस्ट
वयोमर्यादा - यासाठी उमेदवाराचं वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. नियमानुसार एससी, एसटी, ओबीसी एनसीएल, ईएसएम, दिव्यांग उमेदवारांना सूट दिली जाईल.
किती असेल वेतन - सीनियर टेक्निकल असिस्टंट- B - पे मॅट्रिक्स लेव्हल ६ - ३५,४०० ते १,१२,४०० रूपये आणि टेक्निशिअन - A पे मॅट्रिक्स लेव्हल २ वर १९९०० ते ६३,२०० रूपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या