एअर इंडियामध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, निवड थेट मुलाखतीद्वारे, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 02:00 PM2023-10-06T14:00:45+5:302023-10-06T18:55:33+5:30

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiasl.in ला भेट द्यावी लागेल.

job in air india various post recruitment for airlines | एअर इंडियामध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, निवड थेट मुलाखतीद्वारे, असा करा अर्ज...

एअर इंडियामध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, निवड थेट मुलाखतीद्वारे, असा करा अर्ज...

googlenewsNext

एअर इंडियामध्ये १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे (AIATSL)  ३२३ हँडीमेन आणि इतर अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया ३ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली. यामध्ये तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiasl.in ला भेट द्यावी लागेल.

या रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्य ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये भरावे लागतील. तसेच, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल पदासाठी एकूण ५ पदे आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू १७ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येईल. इंटरव्ह्यू सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. इंटरव्ह्यूचे सेंटर म्हणून कोचीनची निवड करण्यात आली आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी २३ पदे आहेत. यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू १७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत इंटरव्ह्यू होणार असून याचे सेंटर कोचीन आहे.

दुसरीकडे, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदासाठी १६ जागा आहेत. यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू १७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत इंटरव्ह्यू होणार आहेत. तर कोझिकोडे हे इंटरव्ह्यूचे सेंटर आहे. हँडीमनसाठी २२४ पदे आहेत. यासाठी कोझिकोडला वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत. याचबरोबर हँडीवुमनसाठी ५५ पदे रिक्त आहेत. यासाठी कोझिकोड हेच इंटरव्ह्यू सेंटर असणार आहे.

ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून फूल टाइम मेकॅनिकल इंनीजिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडचे ज्ञान आवश्यक आहे. दरम्यान, सॅलरी २८,२०० रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आले आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी तीन वर्षांची डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक महिन्याची सॅलरी २३,६४० रुपये निश्चित करण्यात आला आहे.

याचबरोबर,  हॅंडीमॅन आणि हॅंडीवुमन या पदासाठी उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलता येणे आवश्यक आहे. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार १० वी उत्तीर्ण असावेत. तसेच, या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २८ पर्यंत असावे. 

अशाप्रकारे करा अर्ज... 
- उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट aiasl.in वर जा.
- वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना तपासा.
- अर्जदाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो आयडी पुरावा काळजीपूर्वक अपलोड करा.
- अर्ज फी भरा.
- त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.
 

Web Title: job in air india various post recruitment for airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.