सरकारी नोकरीची संधी, माहिती मंत्रालयात असिस्टंटसह अनेक पदांसाठी भरती, आजपासून प्रक्रिया अर्ज सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:09 PM2023-03-04T19:09:38+5:302023-03-04T19:10:01+5:30

या पदांसाठी रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरू झाली आहे.

job openings assistant many other posts in ministry of electronics and information technology application starts from today nielit gov | सरकारी नोकरीची संधी, माहिती मंत्रालयात असिस्टंटसह अनेक पदांसाठी भरती, आजपासून प्रक्रिया अर्ज सुरू

सरकारी नोकरीची संधी, माहिती मंत्रालयात असिस्टंटसह अनेक पदांसाठी भरती, आजपासून प्रक्रिया अर्ज सुरू

googlenewsNext

नवी दिल्ली : नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदांसाठी (NIC Recruitment 2023) उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार NIELIT च्या अधिकृत वेबसाइट nielit.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

या पदांसाठी रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरू झाली आहे. तसेच, ही प्रक्रिया 4 एप्रिल 2023 रोजी संपेल. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 598 पदे भरली जातील. NIC Bharti अंतर्गत नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी खाली देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचा...

NIC Bharti साठी रिक्त जागांची माहिती 
सायंटिस्ट बी ग्रुप ए : 71 पदे
सायंटिस्ट ऑफिसर/इंजीनियर : 196 पदे
सायंटिस्ट/ टेक्निकल असिस्टंट : 331 पदे
एकूण पदांची संख्या : 598

NIC Bharti साठी शैक्षणिक पात्रता
सायंटिस्ट बी ग्रुप ए :  इंजिनिअरिंगमधील पदवीधर पदवी किंवा तंत्रज्ञानातील पदवीधर किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कंप्युटर अभ्यासक्रमाचा मान्यताप्राप्त विभाग बी-स्तर किंवा इंजिनिअर्स संस्थेचे सहयोगी सदस्य किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर कंप्यूटरमध्ये पदवी किंवा इंजिनिअर्स / टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा फिलॉसॉफीमध्ये पदव्युत्तर पदवी असली पाहिजे.
सायंटिस्ट ऑफिसर/इंजीनिअर, सायंटिस्ट/टेक्निकल असिस्टंट : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून M.Sc/MS/MCA/BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 4 मार्च
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 एप्रिल

NIC Bharti साठी इतर माहिती
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार इतर माहितीसाठी NIELIT ची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकतात. विस्तृत अधिसूचना देखील येथे उपलब्ध असणार आहे.

Web Title: job openings assistant many other posts in ministry of electronics and information technology application starts from today nielit gov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी