UGVCLमध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:47 PM2020-08-29T12:47:11+5:302020-08-29T12:47:44+5:30
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
पात्र व इच्छुक उमेदवार अप्पर महाव्यवस्थापक (एचआर), कॉर्पोरेट कार्यालय, उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड, विसनगर रोड, मेहसाणा-384001वर स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. लिफाफ्यात 'BOAT स्कीम अंतर्गत ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसच्या नोकरीसाठी अर्ज' असे लिहिलेले असणं आवश्यक आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
शैक्षणिक पात्रता
वर्ष 2018 ते 2020 या कालावधीत उमेदवारांनी कमीत कमी 55% सह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये नियमित बी.ई/बी.टेक उत्तीर्ण केलेले असावे.
वय श्रेणी
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या वेळी मिळालेल्या गुणांवर आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीवर आधारित असेल. समान स्कोअरमधल्या उमेदवारांपैकी जास्त वयाच्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
स्टायपेंड
सुरुवातीला 9,000 दरमहा प्रशिक्षणार्थी नोकरदारांना मिळतील, या कालावधीत यूजीव्हीसीएलद्वारे वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकते.