ChatGPT मध्ये नोकरीची संधी, वार्षिक ३.७ कोटी पगार; 'या' जागांसाठी निघाली भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 04:14 PM2023-08-12T16:14:25+5:302023-08-12T16:15:50+5:30
OpenAI नं मागील वर्षी ChatGPT लॉन्च केले होते. तेव्हापासून हे चर्चेत आहे. या प्लॅटफोर्मुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती वर्तवण्यात आली होती.
नवी दिल्ली – ChatGPT अन् Artificial Intellgence(AI) चा वाढता प्रभाव लक्षात घेता अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचे म्हटलं जाते. परंतु ChatGPT बनवणारी Open AI कंपनीत सध्या भरती सुरू आहे. या कंपनीतील नोकरीसाठी तब्बल ३.७ कोटींचे वार्षिक पॅकेजही देण्याची तयारी कंपनीने केली आहे. सध्या कंपनीकडून योग्य उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. ही माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
OpenAI नं मागील वर्षी ChatGPT लॉन्च केले होते. तेव्हापासून हे चर्चेत आहे. या प्लॅटफोर्मुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती वर्तवण्यात आली होती. कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांपैकी एकाने सांगितले की, कंपनी नवीन टॅलेंटच्या शोधात आहे. उमेदवाराला कोडिंग, मशीन लॉन्चिंग आणि अन्य बाबींची माहिती हवी. त्यासाठी कंपनीची वार्षिक ३.७ कोटी रुपये पगार देण्याची तयारी आहे.
OpenAI च्या अधिकाऱ्यांची माहिती
OpenAI चे सुपर अलाइनमेंट टीमचे हेड Jan Leike यांनी या नोकरीची माहिती दिली. अलीकडेच एका पॉडकास्ट शोमध्ये ज्याचे नाव The 80000 Hours Podcast असं नाव आहे. त्यात Jan Leike यांनी नोकरीचा खुलासा केला. ते म्हणाले की, कंपनीत रिसर्च बेस्ड कामासाठी जागा खाली आहेत. कंपनी अनेक रिसर्च इंजिनिअर, रिसर्च मॅनेजर, रिसर्च साइस्टिंटचा शोध घेत आहे.
पात्रता काय आहे?
Jan Leike यांनी उमेदवाराच्या पात्रतेवर बोलताना म्हटलं की, आमच्या टीमला अशा उमेदवाराची गरज आहे. ज्यांची कोडिंगवर चांगली पकड आहे. त्यांना मशिन लर्निंगबाबत चांगले ज्ञान असावे. त्यासोबत अनेक माहिती असावी. याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली आहे.
‘इतकी’ असणारी सॅलरी
OpenAI सुपर अलाइनमेंट टीममध्ये रिसर्च इंजिनिअरांना सेफ्टी रिसर्च टीमच्या काही अनुभवी आणि डिझाईन करण्यास सक्षम असणाऱ्या उमेदवाराचा शोध आहे. त्या नोकरीसाठी वार्षिक पगार २४५००० अमेरिकन डॉलर(२ कोटी) पासून ४,५०,००० अमेरिकन डॉलर(३.७ कोटी) पगार मिळेल. त्याशिवाय एक्स्ट्रा अलाऊंसेंसही कंपनीकडून देण्यात येतील.
सोशल मीडिया असो वा सर्वसामान्य नोकरवर्ग प्रत्येक ठिकाणी AI ची चर्चा आहे. अनेक सेक्टर्समध्ये लोक याचा वापर करून चांगली कॉपी रायटिंग करत आहेत. काही लोकांच्या जॉबवर याचे संकट आहे. अलीकडेच एका महिलेने तिची नोकरी जाण्याचं कारण ChatGPT असल्याचे म्हटलं आहे. ही महिला फ्रिलांस कंटेट रायटिंगचे काम करत होती. परंतु ChatGPT आल्यामुळे तिला काम मिळायचे बंद झाले.