CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:22 PM2024-09-20T17:22:47+5:302024-09-20T17:25:25+5:30

CRPF Constable Recruitment 2024: सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता असलेले उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. 

Job opportunity in CRPF, recruitment for more than 11 thousand posts | CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

CRPF Constable Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी सीआरपीएफमध्ये (CRPF) नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. सीआरपीएफमध्ये बंपर पदांसाठी भरती सुरू आहे. सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता असलेले उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. 

५ सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले असून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज केला पाहिजे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना स्टाफ सेलेक्शन कमीशनच्या  ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे अर्ज करण्यासोबत, तुम्ही या पदांची माहिती देखील जाणून घेऊ शकता आणि पुढील अपडेट्सबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

किती जागांसाठी भरती?
या भरती मोहिमेद्वारे एकूण ११५४१ कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पुरुषांच्या पदांची संख्या जास्त असून महिलांसाठी मोजक्याच पदांवर भरती होत आहे. एकूण ११५४१ पदांपैकी १२९९ पदे पुरुष आणि एकूण २४२ पदे महिलांसाठी आहेत.

कोण करू शकतो अर्ज?
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. याबद्दल सविस्तर माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर दिलेली माहिती पाहू शकता.

निवड कशी होणार?
या पदांवरील निवड अनेक स्तरांच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल. ज्यामध्ये प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पीईटी चाचणी, पीएसटी चाचणीही द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीही केली जाईल. एक टप्पा पार करणारेच पुढच्या टप्प्यात जातील आणि निवडीसाठी सर्व टप्पे पार करणे आवश्यक आहे.

अर्जाचे शुल्क किती?
सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. ही फी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी आहे. तर एससी, एसटी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही.

किती मिळेल वेतन?
या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना १८,००० रुपये ते ६९,१०० रुपये मासिक वेतन दिलं जाईल. यासंबंधी कोणतेही माहिती किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी, वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा. 
 

Web Title: Job opportunity in CRPF, recruitment for more than 11 thousand posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी