ONGC मध्ये नोकरीची संधी! सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी भरती, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 05:07 PM2022-12-25T17:07:02+5:302022-12-25T17:07:10+5:30

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) ने सहाय्यक अभियंता (Assistant Engineers) आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी  (Assistant Executives) इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत.

Job opportunity in ONGC Recruitment for the post of Assistant Engineer and Assistant Executive | ONGC मध्ये नोकरीची संधी! सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी भरती, असा करा अर्ज...

ONGC मध्ये नोकरीची संधी! सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी भरती, असा करा अर्ज...

googlenewsNext

मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) ने सहाय्यक अभियंता (Assistant Engineers) आणि सहाय्यक कार्यकारी पदासाठी  (Assistant Executives) इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून  १५ जानेवारी २०२३ अंतिम मुदत असणार आहे. इच्छुक उमेदवारांना mrpl.co.in वर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

ONGC MRPL recruitment vacancy details: 
GATE 2022 च्या माध्यमातून E2 ग्रेडमधील सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक एक्झिक्युटिव्हजच्या ७८ रिक्त जागा आहेत. UGC-NET डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या रोटेशनद्वारे सहाय्यक एक्झिक्युटिव्हजच्या एकूण १३ रिक्त जागा आहेत. तर सहाय्यक कार्यकारी पदासाठी ५ जागा भरल्या जाणार आहेत. 

ONGC MRPL recruitment applicatioht en fee: 
जनरल, EWS आणि OBC श्रेणींसाठी अर्ज शुल्क ११८ रुपये इतके आहे. तर SC/ST/PwBD/ माजी सैनिक श्रेणींना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 

ONGC MRPL recruitment: Know how to apply

  • mrpl.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवरील, करिअर टॅबवर क्लिक करा
  • पुढे, Advt.No.87/2022, Advt.No.86/2022, Advt.No.85/2022 वर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि अर्ज भरा
  • अर्ज फी भरा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरल्याची प्रिंट आउट जरूर घ्या.

Web Title: Job opportunity in ONGC Recruitment for the post of Assistant Engineer and Assistant Executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.