RBI मध्ये नोकरीची संधी!, पात्रता काय आणि कसा कराल अर्ज? वाचा.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 09:23 AM2021-02-02T09:23:11+5:302021-02-02T09:23:35+5:30
RBI JE Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरपदासाठी सरकारी नोकरभरती निघाली आहे.
RBI JE Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअरपदासाठी सरकारी नोकरभरती निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रिर्झव्ह बँकेने ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) आणि ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) विभागात एकूण ४८ जागांसाठी भरती केली जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेने आज नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक उमेदवारांना बँकेच्या rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधिची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे. ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून इच्छुकांना आपला अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू होणार आहे आणि उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
पात्रता काय?
आरबीआयच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीच्या जाहिरातीनुसार उमेदवारानं देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं. याशिवाय, इलेक्ट्रीकल किंवा सिव्हील विभागातून डिल्पोमा विभागातून कमीतकमी ६५ टक्के गुण आणि डीग्री परीक्षेत कमीतकमी ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. यासोबतच संबंधित कामासाठी उमेदवारांना कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणं देखील गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. उमेदवारांचं वय १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा अधिक नसावं, अशीही अट आरबीआयने घातलेली आहे. पण एससी, एसटी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना यातून सूट देण्यात आली आहे.
सुरक्षा गार्ड आणि ग्रेड बी ऑफीसर पदासाठीही भरती
आरबीआयकडू याआधीच तब्बल २४१ पदांसाठी सुरक्षा गार्डच्या पदासाठीही भरती निघाली आहे. तर ग्रेड बी ऑफीसर पदासाठी ३२२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया याआधीच सुरू देखील झाली आहे. सुरक्षा गार्डसाठीची अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १२ फेब्रुवारी आहे. तर ग्रेड बी ऑफीसर पदासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.