JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 303 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:57 AM2022-03-22T10:57:01+5:302022-03-22T11:06:37+5:30

RBI Recruitment 2022 : RBI ने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

job rbi grade b notification 2022 released for 294 officer and assistant manager vacancies | JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 303 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती

JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 303 जागांसाठी भरती, जाणून घ्या, माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) विविध पदांची भरती केली जाणार आहे. RBI ने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत एकूण 303 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांची 294 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 9 पदांचा समावेश आहे. कसा, कुठे आणि कधी अर्ज करायचा हे जाणून घेऊया...

महत्त्वाच्या तारखा

RBI ने जारी केलेल्या संयुक्त जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, 28 मार्चपासून म्हणजेच पुढील आठवड्यात सुरू होईल. उमेदवारांना 18 एप्रिल 2022 च्या संध्याकाळी सहावाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर, ग्रेड बी अधिकारी (सामान्य) पदांसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा 28 मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्याची ऑनलाईन परीक्षा 25 जून 2022 रोजी होणार आहे. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 2 जुलै रोजी आणि दुसरा टप्पा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. दुसरीकडे सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा 21 मे 2022 रोजी होणार आहे.

शैक्षणिक पात्रता 

आरबीआय ग्रेड बी भरती 2022 च्या जाहिरातीमध्ये पात्रतेची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. पण गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून किमान 60 टक्के गुण असावेत. किमान 55 टक्के गुणांसह पीजी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दुसरीकडे, बँकेने विहित केलेल्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

असा करा अर्ज 

आरबीआय ग्रेड बी भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. होमपेजवरील ऑनलाइन अर्जाच्या लिंकद्वारे अर्ज भरा. अर्ज प्रक्रिया जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच 28 मार्च 2022 ला सुरू होईल. आरबीआयच्या करिअर विभागात देण्यात आलेली तपशीलवार सूचना डाऊनलोड करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: job rbi grade b notification 2022 released for 294 officer and assistant manager vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.