Jobs in AI : एआय टूलमध्ये मिळवा प्रभुत्व! 2.5 कोटींपर्यंत मिळेल सॅलरी, देश-विदेशातून मिळतील नोकरीच्या ऑफर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 01:08 PM2023-12-22T13:08:22+5:302023-12-22T13:11:53+5:30
Jobs in AI : एआय संबंधित नोकऱ्यांसाठी भारतात तसेच परदेशात अर्ज करता येतो. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरचा पगार करोडो रुपयांमध्ये असतो.
Jobs in AI Prompt Engineer Salary ( Marathi News ) : नवी दिल्ली : सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (एआय) धूम आहे. एआयची मागणी वाढल्याने या क्षेत्रात नोकऱ्यांचा ओघही वाढला आहे. एआय संबंधित नोकऱ्यांसाठी भारतात तसेच परदेशात अर्ज करता येतो. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरचा पगार करोडो रुपयांमध्ये असतो.
ChatGPT भारतात एआय म्हणून खूप लोकप्रिय होत आहे. काही लोकांना एआयमुळे (AI) नोकऱ्या गमवण्याची भीती आहे. पण, हे एआय लोकांसाठी (AI Jobs) रोजगाराचे साधनही बनत आहे. एआयमुळे अनेक नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर (AI Prompt Engineer) देखील त्यापैकी एक आहे.
एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरच्या पोस्टसाठी जास्त मागणी
आंतरराष्ट्रीय वेबसाइट zdnet.com ने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरच्या वाढत्या मागणीबद्दल सविस्तर लिहिले आहे. या रिपोर्टनुसार, एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर्सना परदेशात $1,75,000 ते $3,00,000 पगाराची ऑफर दिली जात आहे. म्हणजेच भारतीय चलनात हे वेतन वार्षिक 1.4 कोटी ते 2.5 कोटी रुपये आहे.
एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरसाठी काय आहे पात्रता?
एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर होण्यासाठी तुमच्याकडे काही स्किल्स असणे महत्त्वाचे आहे. या स्किल्समध्ये प्रामुख्याने प्रोग्रामिंग, एआय टूल्समधील प्राविण्य, प्रॉब्लेम सोडवणे आणि कलात्मक क्षमता यांचा समावेश होतो. यासाठी, केवळ विविध एआय टूल्सवर (AI Tools) तुमची मजबूत पकड असली पाहिजे, असे नाही तर टेक्नॉलॉजीसह अप टू डेट राहणे देखील महत्त्वाचे आहे.
वाढत्या मागणीदरम्यान एक्सपर्टची कमतरता
एकीकडे एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर्सची मागणी वाढत असताना दुसरीकडे त्यांची नियुक्ती करणे सोपे नाही. एक तर त्यांचा पगार खूप जास्त आहे आणि दुसरे म्हणजे एक्सपर्ट म्हणून 3 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेला उमेदवार मिळणे कठीण होत आहे. दरम्यान, हे क्षेत्र आणि यासंर्दभातील अभ्यास सुरू होऊन फार काळ लोटला नाही.