गुड न्यूज! टेक सेक्टरमध्ये ‘ही’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या; संकटात दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:08 PM2021-05-13T14:08:26+5:302021-05-13T14:09:09+5:30

JP Morgan: भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.

jp morgan to hire 4 thousand techies in indian units this year | गुड न्यूज! टेक सेक्टरमध्ये ‘ही’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या; संकटात दिलासा

गुड न्यूज! टेक सेक्टरमध्ये ‘ही’ कंपनी देणार ४ हजार नोकऱ्या; संकटात दिलासा

Next

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक वृत्त असून, नोकरी मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे. भारतीयांसाठी टेक सेक्टरमध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे. (jp morgan to hire 4 thousand techies in indian units this year)

अमेरिकेची बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan) यंदाच्या वर्षी हजारो जणांना नोकरी देण्याची योजना असून, भारतात जवळपास ४ हजार अनुभवी टेक्नोलॉजिस्टना कंपनीसोबत जोडले जाणार आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनकडून देण्यात आली आहे.

एलन मस्क यांचे एक ट्विट आणि बिटकॉइन गडगडलं; नेमके काय घडलंय

बेंगळुरूच्या टेक सेंटरसाठी होणार भरती

जेपी मॉर्गन कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील टेक सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. बँकेने यूएस इंडिया फ्रेंडशी अलायन्ससह कोविड मदतीसाठी २ मिलियन देण्याची घोषणा केली आहे. जेपी मॉर्गन चेस ने भारतात कोविड महामारीला रोखण्यासाठी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मदतीचे आवाहन केले आहे, अशी माहिती जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन यांनी दिली आहे. 

भारतीय रेल्वेच्या ‘या’ विभागात १०७४ पदांवर भरती; १.६० लाखांपर्यंत पगार

यशस्वी आणि बिजनेस स्ट्रेटजीसाठी महत्त्वपूर्ण

आमचे ग्राहक यशस्वी आणि बिजनेस स्ट्रेटजीसाठी टेक्नोलॉजी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही नेहमीच यांच्या प्रतिभेला विकसित करण्यासाठी सज्ज असतो. ज्यात क्लाउड डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सायबर स्पेससारखे सेक्टरचा समावेश आहे, असे जेपी मॉर्गनमधील एचआर इंडिया कॉर्पोरेट सेंटरचे हेड गौरव अहलूवालिया यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जेपी मॉर्गनमध्ये आताच्या घडीला २.५ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ३५ हजार कर्मचारी भारतात असून, हे सर्व कर्मचारी बंगळुरू, मुंबई आणि हैदराबादमधील टेक्नोलॉजी अँड ऑपरेशन्स सेंटरमध्ये काम करीत आहेत. हे सेंटर ग्लोबल इंवेस्टमेंट बँकेच्या ऑपरेशनला सपोर्ट करते.
 

Web Title: jp morgan to hire 4 thousand techies in indian units this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.