नोकरी, करिअर, सबकुछ: स्मार्ट वर्क म्हणजे काय रे भावा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2023 09:52 AM2023-03-12T09:52:00+5:302023-03-12T09:52:41+5:30
स्मार्ट वर्क करण्यासाठी एकाचवेळी अनेक कामे हाती घेण्याची गरज असते, असा समज आहे. खरे पाहता मल्टिटास्किंगचा अनुभव मोहक असू शकतो. परंतु ती कुशल पद्धत नाही. कसे? वाचा मग...
संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक
विनम्रपणे नाही म्हणायला शिका : एखाद्या कामाला नाही म्हणणे, ही एक कला आहे. दुसऱ्यांनी तुम्हाला दिलेल्या प्रत्येक कामाला हो म्हणणे तुम्हाला ओव्हरलोड होऊ शकते आणि त्यात शक्तीही जास्त खर्च होते. स्मार्ट कामासाठी आपण आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत व विनम्रपणे नाही म्हणायला शिकले पाहिजे.
छोटे ब्रेक घ्या : उत्साह कायम ठेवण्यासाठी मध्ये-मध्ये छोटे ब्रेक घेणे आवश्यक आहे. स्मार्ट कामात आपले मन प्रसन्न ठेवण्यासाठी आणि आपली एनर्जी लेव्हल रिचार्ज करण्यासाठी ते गरजेचे आहे. या कालावधीत थोडेसे फिरणे, स्ट्रेचिंग व्यायाम करणे किंवा काही मिनिटे ध्यान करणे अधिक ऊर्जावान बनवते.
वास्तववादी लक्ष्य समोर ठेवा : स्मार्ट वर्क करण्यासाठी असेच लक्ष्य समोर ठेवावे लागतात, जे पूर्ण होऊ शकतात. मोठ्या कामाचे छोटे-भाग करून काम सोपे करता येते.
उद्याचेही प्लॅनिंग करा : उद्याचे प्लॅनिंग करण्यासाठी आजच्या दिवसाच्या अखेरीस काही वेळ राखून ठेवा. यामुळे फोकस्ड काम करता येते. काय काम करायचे, याचा विचार करण्यात वेळ वाया जाणार नाही.
वर्क डेलिगेशन : स्मार्ट वर्कमध्ये वर्क डेलिगेशन एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. याद्वारे कामे इतरांना सोपवून आपण आणखी महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ काढू शकता. कोणती कामे इतरांकडे सोपवली जाऊ शकतात आणि त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे, हेही कौशल्य आहे.
शिकत राहा, सुधारणा करत राहा : स्मार्ट वर्कसाठी आपल्याला शिकण्याची आणि सुधारण्याची संधी नेहमीच खुली असते. यासाठी पुस्तके वाचणे, सेमिनारमध्ये सहभाग नोंदवणे, ज्ञान-क्षमता वाढवणे, यासाठी वेळ काढावा लागतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"