महामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:41 PM2020-08-07T18:41:49+5:302020-08-07T18:42:14+5:30

आज आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत याबाबत सांगणार आहोत.

Know Tips of every job requires these 10 essential qualifications | महामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या

महामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या

Next

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांना जॉब मिळवायची इच्छा असते. कोणाला आवड म्हणून तर कोणाला नाईलाजाने नोकरी करावी लागते. कारण जोपर्यंत नोकरी मिळणार नाही तोपर्यंत पैसेही मिळणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत याबाबत सांगणार आहोत. कारण सध्या कोरोनाच्या माहामारीमुळे अनेक ठिकाणी कर्मचारी कपात करण्यात आली आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल आपल्या कामाबाबत इमानदार असणं गरजेचं आहे. 

सर्वच ठिकाणी इमादारीने आपलं काम करत राहाल तरच टिकून राहाल. काम अनेकजण करतात पण कामाबाबत बोलता येणं पण गरजेचंअसतं. तुम्ही ज्याप्रकारे काम करता ते सांगता येणंही तितकंच महत्वाचं असतं.  जर तुमच्या कंपनीचा विकास होईल त्यावेळी तुमचा विकास होईल. म्हणून बेस्ट देण्याचा प्रयत्न करा.

एक माणूस एकावेळी एकच काम करतो असं पूर्वी असायचं. पण आता एकाच पोस्टवर असताना अनेक काम पाहावी लागतात. त्यामुळे तुम्हाला सगळी कामं यायलाच हवीत. नसल्यास ती कामं शिकून घेण्याची तयारी असावी. माझ्या कडून कसं होईल? मला करता येईल का? असा विचार करू नका. नेहमी पॉजिटिव्ह विचार ठेवा. डिजीटल फ्रेंण्डली व्हा म्हणजेच सोशल मीडियाचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊन वापर करा.

वेळेनुसार स्वतःला बदला. तसंच तुम्ही जे काही करणार आहात त्याची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर प्रोफाइल तुम्ही नेहमी अपडेट करतंच असाल, पण नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर तुम्ही आपलं प्रोफाईल अपडेट करायला हवं. त्यामुळे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते. कारण कोरोनाच्या महामारीमुळे जॉब मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणून तुमचा सिव्ही लिक्डंइन प्रोफाईवर अपडेट करा. जॉब व्यतिरिक्त इतर कंपनीची माहिती घ्या,  आपल्या बॉस सोबत नवीन आयडिया शेअर करा, स्वतःचा सिव्ही लेटेस्ट फोरमॅटनुसार तयार करा. 

हे पण वाचा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

Web Title: Know Tips of every job requires these 10 essential qualifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.