बँकेत अधिकारी होण्याची आज शेवटची संधी, 7 हजार पदांसाठी होणार भरती!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:38 AM2022-08-22T11:38:43+5:302022-08-22T11:48:15+5:30
IBPS PO Recruitment 2022/Bank JOB : बँक पीओ (Bank PO) बनण्यास इच्छुक असलेले उमेदवार ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.
इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) 6 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या (PO) जवळपास 7000 रिक्त पदांची भरती करणार आहे. या भरती मोहिमेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधील पदवीधर किंवा उमेदवार या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आजची (22 ऑगस्ट 2022) शेवटची आहे. बँक पीओ (Bank PO) बनण्यास इच्छुक असलेले उमेदवार ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IBPS ने बँक पीओच्या 6932 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी IBPS ने 1 ऑगस्टला सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाने 6,432 प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. या भरतीतील सर्वाधिक रिक्त जागा कॅनरा बँकेत आहेत. एकूण 6932 पैकी 2799 पदे आरक्षित आहेत. एससी प्रवर्गासाठी 1071 पदे, एसटी प्रवर्गातील 520 पदे, ओबीसीसाठी 1876 आणि ईडब्ल्यूएससाठी 666 पदे भरण्यात येणार आहेत.
सहभागी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या निवडीसाठी प्रिलिम्स आणि मुख्य ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर IBPS पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावेल. प्रवेशपत्र, परीक्षेसह सर्व महत्त्वाच्या तारखांची माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे.
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेली आवश्यक माहिती तपासावी. पहिल्यांदा IBPS च्या अधिकृत वेबसाईट ibps.in वर जा. त्यानंतर होम पेजवर दिसणार्या PO Recruitment च्या लिंकवर जा. त्यानंतर आता स्वतःचे रजिस्ट्रेशन करा आणि लॉगिन करा. त्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शेवटी, फी जमा करा आणि फायनल सबमिट करा, त्यासोबत तुमच्या भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा.
अर्जाच्या फी संदर्भात माहिती
या नोकऱ्यांसाठी पात्र उमेदवारांची निवड प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 850 रुपये ठेवण्यात आले आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये फी आहे. फी जमा करण्याची आज 22 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उमेदवार अधिसूचनेत सर्व आवश्यक माहिती तपासू शकतात.