LPU मधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याने मिळवलं 3 कोटींचे पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 04:51 PM2022-07-27T16:51:14+5:302022-08-02T14:17:25+5:30

LPU मधून पदवी घेतल्यानंतर त्याने दुसरी कोणतीही पदवी घेतली नाही. तो त्याच्या यशाचे श्रेय LPU मध्ये मिळालेल्या मूलभूत ज्ञानाला देतो.

LPU graduate gets 3 Crore package | LPU मधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याने मिळवलं 3 कोटींचे पॅकेज

LPU मधून ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याने मिळवलं 3 कोटींचे पॅकेज

googlenewsNext

LPU च्या 2018 या पदवीच्या वर्षात उत्तीर्ण झालेल्या यासिर एम. याने 3 कोटी रूपयांच्या पॅकेजची नोकरी मिळवून एक नवा 'प्लेसमेंट रेकॉर्ड' प्रस्थापित केला. मूळचा केरळचा असलेला यासिर हा लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मधील B. Tech CSE पदवीधर आहे आणि तो आता एका जगप्रसिद्ध मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम करणार आहे. या कंपनीने कोरोना महामारीच्या काळात जगासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा कंपनीत यासिरला तब्बल 3 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. LPU मधून पदवी घेतल्यानंतर त्याने इतर कोणतीही पदवी घेतली नाही आणि या यशाचे श्रेय त्याने LPU कॅम्पसमध्ये शिकत असताना मिळालेल्या भक्कम अशा मूलभूत गोष्टी आणि ज्ञानाला दिले आहे.

LPU मध्ये असताना त्याची नेहमीच हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणती केली जात होती. त्याने 8.6 च्या CGPA सह कॉम्प्युटर सायन्समध्ये B Tech पूर्ण केले. कॅम्पसमधील असंख्य हॅकाथॉन आणि इतर तांत्रिक कार्यक्रमांचा तो नेहमीच भाग राहिला आणि त्यापैकी बहुतेक स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. "मी LPU मध्ये असताना मला AI, ML सारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाचा अनुभव घेता आला आणि मी जगभरात मित्र बनवले. प्राध्यापकांनी दिलेल्या संधीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला एका भव्य भूमिकेसाठी तयार होण्यास मदत झाली. मला खूप आनंद आहे की मी केवळ माझ्या पालकांनाच नव्हे तर संपूर्ण विद्यापीठाला आणि भारताला अभिमान वाटेल अशी जर्मनीमध्ये काम करण्याची मोठी नोकरीची संधी मिळवली", असे मोहम्मद म्हणाला.

केवळ यासिरलाच अशी ऑफर मिळाली असं नाही, तर हजारो LPU माजी विद्यार्थी देखील जगभरातील Google, Apple, Microsoft, Mercedes आणि Fortune 500 सारख्या इतर प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये १ कोटी आणि त्याहून अधिक पॅकेजेसच्या नोकऱ्या मिळवून कार्यरत आहेत.

अलीकडेच LPU B.Tech पदवीधर विद्यार्थी हरेकृष्ण महतो याने 2022 मध्ये Google च्या बेंगळुरू कार्यालयात ६४ लाखांच्या प्रशंसनीय पॅकेजची नोकरी मिळवली. हे पॅकेज नक्कीच कोणत्याही तरुण पदवीधरासाठी मिळालेल्या सर्वोच्च पॅकेजपैकी एक आहे. हरे कृष्णाचे LPU बद्दल काय म्हणणे आहे ऐका:

विद्यापीठाचे शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दृष्टीने असलेले सातत्य, विद्यार्थ्यांसाठी संधींचा न संपणारा प्रवाह आणि विद्यार्थ्यांना सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी असलेला उत्तम प्लेसमेंट सपोर्ट यामुळे LPU कडे अतुलनीय असे प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. तसेच, या वर्षी LPU ने सर्वोच्च प्लेसमेंट रेकॉर्डपैकी एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कारण LPU चा विद्यार्थी अर्जुन याला थेट कॅम्पसमधून 63 लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. संपूर्ण भारतातील कोणत्याही अभियांत्रिकी फ्रेशरला मिळालेले हे सर्वोच्च पॅकेज आहे. अर्जुनचे LPU बद्दल काय म्हणणे आहे ऐका:

त्यासोबतच, केवळ काही मोजकेच विद्यार्थी नव्हे तर LPUच्या 2021, 22 फ्रेश बॅचच्या तब्बल 431 विद्यार्थ्यांनी 10 लाख आणि त्याहून अधिकच्या पॅकेजवर नोकऱ्या मिळवल्या आहेत. इतकेच नाही तर प्रतिष्ठित व मोठ्या कंपन्यांनी (marquee recruiters) 10 लाखांपर्यंतच्या विविध पॅकेजवर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नोकरीसाठी भरती करून घेतली आहे. LPU मधून सर्वाधिक संख्येने भरती करणार्‍या शीर्ष कंपन्यांमध्ये कॉग्निझंटने 670 पेक्षा अधिक LPU विद्यार्थ्यांची भरती केली. त्याचप्रमाणे, Capgemini ने 310 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची भरती केली. विप्रोने 310 पेक्षा अधिक, MPhasis ने 210 पेक्षा जास्त आणि Accenture ने 150 पेक्षा विद्यार्थ्यांची भरती केली आहे आणि अशी आणखी बरीच मोठी नावं आहेत. अलिकडच्या वर्षांमध्ये, मोठमोठ्या कंपन्यांकडून LPU मधील 20,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स / इंटर्नशिप ऑफर केल्या गेल्या आहेत. Fortune 500 कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांनी 5000 पेक्षा जास्त ऑफर्स दिल्या आहेत.

अशा प्रशंसनीय कहाण्या दाखवून देतात की LPU ही भारतातील एक सर्वोच्च संस्था म्हणून कशी उदयास आली आहे आणि इथून मोठ्या प्लेसमेंट्स मिळण्याचा रेकॉर्ड हा एक सामान्य दिनक्रमाचा नियम कसा बनत आहे.

प्रतिष्ठित अशा 'टाइम्स हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रँकिंग 2022' द्वारे जागतिक स्तरावर 74 व्या क्रमांकावर असलेले LPU हे जगभरातील आणि भारतातील तरुणांना उत्कृष्ट शिक्षण आणि प्लेसमेंटच्या संधी देते. त्यासह अत्याधुनिक कॅम्पस, 300+ विद्यापीठांशी टाय-अप आणि एकाच आस्थापनामध्ये 28 भारतीय राज्ये आणि 50+ देशांतील विद्यार्थी हे पैलू LPU मध्ये शिक्षण घेण्यासाठी विचारात घेण्यासारख्या बाबी आहेत.

LPU मध्ये 2022 च्या वर्षासाठीचे प्रवेश लवकरच बंद होत आहेत. परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या लिंकवर भेट द्यावी.

Web Title: LPU graduate gets 3 Crore package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.