MAHATRANSCO Recruitment 2022: महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 03:49 PM2022-04-01T15:49:55+5:302022-04-01T15:50:34+5:30

MAHATRANSCO Recruitment 2022: सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठीची नियमावली जारी झाली आहे.

MAHATRANSCO Recruitment 2022: Golden Opportunity in Mahapareshan, Recruitment for Various Posts, Eligibility and Conditions | MAHATRANSCO Recruitment 2022: महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती  

MAHATRANSCO Recruitment 2022: महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती  

googlenewsNext

मुंबई - सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठीची नियमावली जारी झाली आहे. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट इंजिनियर (ट्रान्स.), असिस्टंट इंजिनियर (दूरसंचार), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (ट्रान्स.), सुपरिटेंडेंट इंजिनियर (सिव्हिल), चीफ जनरल मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान) एक्झिक्युटिव्ह निर्देशक (संचालन) आणि एक्झिक्युटिव्ह निर्देशक (उपक्रम) भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक उमेदवार महापारेषणच्या mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. त्याशिवाय उमेदवार थेट https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज दाखल करू शकतात. महापारेषणच्या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण २४३ पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण नोंदी पुढीलप्रमाणे आहेत 
- भरतीमधील एकूण पदांची संख्या २४३
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल 
- नोटिफिकेशनमध्ये पदांसाठी सांगितलेली पात्रता उमेदवारांकडे असली पाहिजे

 या भरतीसाठीची पदनिहाय वर्योमर्यादा पुढील प्रमाणे आहे
एक्झिक्युटिव्ह संचालक - ५९ वर्षे
सीजीएम - ५० वर्षे
चीफ इंजिनियर - ५० वर्षे 
सुपरिटेंडेंट इंजिनियर ४५ वर्षे

इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क 
खुला प्रवर्ग - ८०० रुपये 
आरक्षित जाती श्रेणी आणि ईडब्ल्यूएस ४०० रुपये

Web Title: MAHATRANSCO Recruitment 2022: Golden Opportunity in Mahapareshan, Recruitment for Various Posts, Eligibility and Conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.