ऑफिसमधील गॉसिपमुळे कर्मचा-यांना या गोष्टींना द्यावं लागतं तोंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 12:43 PM2018-04-07T12:43:18+5:302018-04-07T12:43:18+5:30
कोणत्याही ऑफिसमध्ये गॉसिप्स होतातच. पण हे सर्व करताना काही लोक ध्यानातच घेत नाहीत की, कामाच्या वेळेत फालतू गप्पा करण्याने ऑफिसमधील इतरांना त्रास होत......
(Image Credit: www.camizu.org)
कोणत्याही ऑफिसमध्ये गॉसिप्स होतातच. पण हे सर्व करताना काही लोक ध्यानातच घेत नाहीत की, कामाच्या वेळेत फालतू गप्पा करण्याने ऑफिसमधील इतरांना त्रास होत असेल किंवा कंपनीला आपल्या या गप्पांमुळे नुकसान होत असेल….या गॉसिप्समुळे काय काय होऊ शकतं याचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे...
१) प्रामाणिकपणे काम करणा-याला टेन्शन
बरेचदा ऑफिस सहका-यांमध्ये कंपनी विरोधात रंगलेल्या गप्पांमुळे प्रामाणिकपणे काम करणा-यांना टेन्शन येतं. प्रामाणिकपणे काम करणारे लोकं कंपनीला किती इन्कम होतं. आपल्याला किती देतात. खर्च किती करतात याचा विचार करत नसतात. त्यांना त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे ते अवांतर गोष्टींवर गप्पा मारत बसण्यापेक्षा आपल्या कामात लक्ष देतात. पण अशांनाही इतरांच्या विनाकारण गप्पांमुळे टेन्शन येतं.
२) गप्पांमुळे दुस-यांना त्रास
कामं सोडून रिकाम्या गप्पा करणारे कधीही दुस-यांचा विचार करत नाहीत. ते त्यांच्या गप्पांमध्ये हरवलेले असतात. ते हा सुद्धा विचार करत नाहीत की, यामुळे दुस-या काम करत असलेल्या कर्मचा-यांना आपल्या गप्पांमुळे त्रास होत असेल. पण याचा दुस-यांना त्रास होतो.
३) कंपनीचा वेळ वाया
ज्या कामासाठी कंपनीने तुम्हाला नोकरी दिली आहे ते सोडून तुम्ही गप्पा मारत बसता याने कंपनीचा वेळ वाया जातो. कंपनी नवनवे प्लॅन करीत असते त्यासाठी कंपनीच्या कर्मचा-यांनी वेळेवर कामे संपवणे अपेक्षित असते. पण तसे होत नाही. काम पूर्ण करायचे सोडून बरेचजण रिकाम्या गप्पांमध्ये रंगले असतात. याने स्वत:चा आणि कंपनीचाही ते वेळे वाया घालवतात हे त्यांच्या लक्षात येत नाही.
४) कामावर दुर्लक्ष होतं
सकाळी आल्या आल्या जर तुम्ही कामाला लागलात तर दिवस चांगला जातो असं निरीक्षण आहे. नाहीतर आल्या आल्या जर तुम्ही गप्पा करायला लागलात तर कामावरून लक्ष दुर्लक्षित होतं. कामाचा आळस येतो. त्यामुळे तुमचे दिवसभर फार काही काम होत नाही. त्यामुळे याचाही फटका कंपनीला बसतो आणि अर्थातच बॉसना टेन्शन येतं.
५) ओव्हर टाईम करावा लागतो
जर वेळेवर काम पूर्ण झालं नाहीतर कित्येक तास ओव्हर टाईम करावा लागतो. कधी कधी तर रात्रंदिवस सुद्धा काम करावं लागतं. अशाने तुमच्या आरोग्याला धोका होतो. तुमची झोप होत नाही. तुमचं जेवण वेळेवर होत नाही. याने तब्येत बिघडू शकते म्हणजे अर्थातच काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे गप्पा मारण्यापेक्षा वेळेत काम केलेले कधीही बरे…!