IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 04:34 PM2022-08-13T16:34:11+5:302022-08-13T16:35:17+5:30

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करता येणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या...

msc bank recruitment 2022 vacancy for various post for it graduates of job in maharashtra state cooperative bank | IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स 

IT उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; पाहा, डिटेल्स 

googlenewsNext

MSC Recruitment 2022: आताच्या घडीला खासगी असो वा सार्वजनिक क्षेत्रातील अनेकविध ठिकाणी नोकरीच्या उत्तमोत्तम संधी आहेत. अगदी दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांपासून ते उच्च शिक्षण घेतलेल्यांना आपापल्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यातच महाराष्ट्रातील उमेदवारांना बँकेतील नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank Limited) येथे इन्फॉर्मेशन सिक्योरीटी अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (MSC Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले आहे. भरती केल्या जात असलेल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करता येणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय?

ज्युनिअर ऑफिसर अंतर्गत सायबर सिक्योरीटी ऑपरेशनची ४ पदे, डिजिटल पेमेंट चॅनलची ३ पदे, सॉफ्टवेअरचे १ पद, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद, ऑफिस डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद, ऑफिस सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेशनचे १ पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीई/बीटेक कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन किंवा बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स/एमसीए/एमएससी कॉम्प्युटर सायन्स/आयटीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ३० जून २०२२ पर्यंत २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे, असे सांगण्यात आले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. २९ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असा सल्ला दिला जात आहे. 
 

Web Title: msc bank recruitment 2022 vacancy for various post for it graduates of job in maharashtra state cooperative bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.