Naval Dockyard मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:51 PM2022-07-11T12:51:35+5:302022-07-11T12:52:37+5:30
Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 : या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2022) काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आज यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
मुंबई : नौदलात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेव्हल डॉकयार्ड मुंबईने (Naval Dockyard Mumbai) काही दिवसांपूर्वी अप्रेंटिसच्या (Naval Dockyard Mumbai Recruitment 2022) पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती.
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2022) काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आज यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे, पात्र आणि इच्छुक असूनही, जर काही कारणास्तव तुम्हाला आत्तापर्यंत अर्ज करता आला नसेल, तर आत्ताच करा.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई (Naval Dockyard Mumbai Bharti 2022) अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे. या भरतीतून 338 पदे भरली जाणार आहेत. निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्टायपेंड तसेच डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्जदार उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच त्यांच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 2002 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा 22 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. लेखी परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल. जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील, त्यांनाच मुलाखत चाचणी आणि कौशल्य चाचणीत बसण्याची संधी दिली जाईल.
या वेबसाइटद्वारे करा अर्ज...
नेव्हल डॉकयार्ड मुंबईच्या (Naval Dockyard Mumbai Maharashtra Apprentice Recruitment 2022) फक्त अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी इच्छुक उमेदवार dasapprenticembi.recttindia.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. नेव्हल डॉकयार्ड मुंबईच्या या भरती मोहिमेद्वारे अप्रेंटिसच्या एकूण 338 पदांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाईल. डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलमधील प्रशिक्षणासाठी, उमेदवारांना आधी नावनोंदणी करावी लागेल.