नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक पदासाठी भरती, जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 08:28 PM2022-05-04T20:28:08+5:302022-05-04T20:29:33+5:30
NBCL Clerk Recruitment 2022: अधिसूचनेनुसार, या लिपिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 रोजी सुरू झाली. पात्र उमेदवार 17 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (NBCL) ने मुंबईतील विविध शाखांमध्ये 12 लिपिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बँकेने या भरतीची अधिसूचना जारी केली असून अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पात्र उमेदवार बँकेच्या nationalbank.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेला बसावे लागेल. तसेच, परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि यादी तयार करणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. अधिसूचनेनुसार, या लिपिक पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 रोजी सुरू झाली. पात्र उमेदवार 17 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अर्जाची लिंक निष्क्रिय होईल. याविषयी अधिक माहिती तुम्ही वेबसाइटवर मिळवू शकता.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी त्याच मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. बँकिंगमध्ये एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठी भाषेचेही ज्ञान असावे. तसेच, वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास अर्जदारांचे कमाल वय 35 वर्षे असावे.
कशी असेल निवड प्रक्रिया?
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षेला जावे लागेल. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. कागदपत्रे पडताळणीनंतर जे या गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतील, त्यांना नोकरी मिळेल. उमेदवारांना मुंबईतील विविध शाखांमध्ये नियुक्ती मिळेल.