NCERT मध्ये नोकरीची संधी, 292 पदांसाठी भरती, 1.44 लाखपर्यंत सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:39 PM2022-10-10T16:39:35+5:302022-10-10T16:42:06+5:30

NCERT Recruitment : NCERT कडून जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे.

ncert recruitment 2022 assistant professor librarian vacancy salary apply at ncert nic in | NCERT मध्ये नोकरीची संधी, 292 पदांसाठी भरती, 1.44 लाखपर्यंत सॅलरी

NCERT मध्ये नोकरीची संधी, 292 पदांसाठी भरती, 1.44 लाखपर्यंत सॅलरी

googlenewsNext

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. NCERT द्वारे प्राध्यापक, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 292 पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते  NCERT Recruitment च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

NCERT कडून जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत देण्यात आली आहे. यामध्ये प्राध्यापकाच्या 40, सहयोगी प्राध्यापकाच्या 97 आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 155 जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

NCERT Vacancy साठी असा करा अर्ज
स्टेप 1-  अर्ज करण्यासाठई सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ncert.nic.in ला भेट घ्या.
स्टेप 2- वेबसाइटच्या होम पेजवर Latest Updates च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 - यानंतर  Advertisement for filling up of 292 Faculty Positions च्या लिंकवर जा.
स्टेप 4 - आता Apply Online Now च्या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 5 - त्यानंतर पेज सांगण्यात आलेले डिटेल्स भरून रजिस्टेशन करा.
स्टेप 6 -  रजिस्ट्रेशननतंर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
स्टेप 7 - यानंतर फी जमा करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
स्टेप 8 - अर्जाची प्रिट आवश्यक करा.

अर्ज शुल्क
फी जमा केल्यानंतरच या रिक्त पदावरील अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी, महिला, एससी, एसटी आणि पीएच कॅटगरीतील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. तसेच, अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर जा आणि अधिसूचना तपासा.

शैक्षणिक पात्रता
या रिक्त पदांद्वारे विविध विषयातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांवर भरती होणार आहे.प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पीएचडी पदवी आणि 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, सहायक प्राध्यापक पदावंर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना  UGC NET, SLET किंवा SET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यामध्ये  M.Phil होल्डर सुद्धा अर्ज करू शकतात. तर सहयोगी प्राध्यापक पदासांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांजवळ  PhD ची डिग्री आणि संबंधित विषयात पीडी डिग्री असणे आवश्यक आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. 

Web Title: ncert recruitment 2022 assistant professor librarian vacancy salary apply at ncert nic in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.