NCL Recruitment 2021: नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये १५०० जागांवर भरती; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 02:27 PM2021-06-28T14:27:10+5:302021-06-28T14:27:59+5:30

NCL Recruitment 2021: इयत्ता ८ वी आणि १० वीनंतर सरकारी नोकरी मिळणं हे तर आता एक स्वप्नच होऊन बसलं आहे. पण हेही स्वप्न आता खरं होणार आहे.

NCL Recruitment 2021 vacancy for Apprentice post in Northern Coalfields Limited | NCL Recruitment 2021: नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये १५०० जागांवर भरती; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या...

NCL Recruitment 2021: नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये १५०० जागांवर भरती; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या...

Next

NCL Recruitment 2021: इयत्ता ८ वी आणि १० वीनंतर सरकारी नोकरी मिळणं हे तर आता एक स्वप्नच होऊन बसलं आहे. पण हेही स्वप्न आता खरं होणार आहे. कारण नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) कंपनीनं अॅप्रेंटिसपदांवर नोकर भरतीची घोषणा केली आहे. यानुसार एकूण १५०० जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. यात इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी nclcil.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. (NCL Recruitment 2021 vacancy for Apprentice post in Northern Coalfields Limited)

नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (Northern Coalfields Limited)जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार १५०० पदांच्या भरतीसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया १० जून २०२१ पासूनच सुरू झाली आहे. यात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख ९ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी nclcil.in वर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. 

कोणत्या पदांवर भरती?
नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये १५०० जागांवर भरती केली जाणार असून यात वेल्डरसाठी १०० जागा, फिटरसाठी ८०० जागा, इलेक्ट्रिशनसाठी ५०० जागा आणि मोटर मॅकेनिकपदासाठी १०० जागा आहेत. यात खुल्यावर्गासाठी ७६२ जागा, ओबीसी प्रवर्गासाठी २२५ जागा, अनुसूचित जातीसाठी २१३ जागा आणि अनुसूचित जमातीसाठी ३०० जागा राखीव असणार आहेत. याशिवाय पीडब्ल्यूडी श्रेणीत येणाऱ्या उमेदवारांसाठी ६० जागा आहेत. 

उमेदवाराची पात्रता काय असावी?
वेल्डर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं. तर इलेक्ट्रिशनपदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वीपर्यंतचं शिक्षण आणि आयटीआयचं शिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे. यात यूपी आणि एमपी बोर्डाचे उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. याशिवाय फिटर पदासाठी देखील इयत्ता १० वी आणि आयटीआयचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 

वयाची अट
नॉर्दर्न कोलफील्डकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार उमेदवाराचं वय १६ वर्षांपेक्षा अधिक आणि २४ वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर आरक्षित असलेल्या जागांसाठी वयाच्या अटीत शिथिलता देण्यात आली आहे. या पदांवर उमेदवारांची मेरिटच्या आधारे नियुक्ती केली जाईल. शॉर्ट लिस्ट करण्यात येणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतरच संबंधित उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. 

Web Title: NCL Recruitment 2021 vacancy for Apprentice post in Northern Coalfields Limited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.