AI प्रोफेशनल्सला करोडपती बनण्याची संधी, Netflix देणार 7.4 कोटींचे पॅकेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 10:53 PM2023-07-30T22:53:36+5:302023-07-30T22:54:11+5:30

Artificial Intelligence Job Opportunities : अमेरिकन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्ट मॅनेजरची नियुक्ती करत आहे.

netflix offering 7 crore salary package artificial intelligence jobs for ai professionals tech | AI प्रोफेशनल्सला करोडपती बनण्याची संधी, Netflix देणार 7.4 कोटींचे पॅकेज!

AI प्रोफेशनल्सला करोडपती बनण्याची संधी, Netflix देणार 7.4 कोटींचे पॅकेज!

googlenewsNext

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे एक उदयोन्मुख सेक्टर आहे. जर तुम्ही एआय टेक्नॉलॉजीत परफेक्ट असाल तर तुम्हाला उत्तम संधी मिळू शकते. ज्यांना एआयची माहिती आहे, ते प्रोफेशनल करोडपती देखील बनू शकतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण, दिग्गज लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix)अशीच एक ऑफर आणली आहे. याठिकाणी एआय प्रोफेशनल्सला करोडपती बनण्याची संधी मिळत आहे. 

दरम्यान, अमेरिकन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्ट मॅनेजरची नियुक्ती करत आहे. या पोस्टसाठी नेटफ्लिक्स कंपनी 9 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 7.4 कोटी रुपये वार्षिक पगार देणार आहे. नेटफ्लिक्समध्ये एआयच्या कामाला चालना देण्यासाठी एआय प्रॉडक्ट मॅनेजरची नेमणूक केली जात आहे. या पदाचे अधिकृत नाव 'प्रॉडक्ट मॅनेजर - मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म' आहे. ज्याला ही नोकरी मिळेल, त्याला कंपनी 3 लाख डॉलर ते 9 लाख डॉलर पगार देईल. 

भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 2.4-7.4 कोटी रुपये आहे.ही पोस्ट नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्रोग्रामला पुढे नेण्यासाठी आहे. एआय प्रोडक्ट मॅनेजरची पोस्टिंग नेटफ्लिक्सच्या लॉस गॅटोस, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होऊ शकते. याशिवाय, वेस्ट कोस्टमध्ये राहून काम करावे लागणार आहे. या पोस्टअंतर्गत, कंपनीच्या व्यवसायात एआयचा वापर, सामग्री संपादन आणि वैयक्तिकृत वापरकर्त्याच्या शिफारसींसह, अधिक चांगल्या प्रकारे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, आमचे 190 हून अधिक देशांमध्ये 23 कोटीहून अधिक मेंबर्स आहेत. नेटफ्लिक्स संपूर्ण जगभरात एंटरटेन्मेंटच्या फ्यूचरला आकार देत आहे. तसेच, कंपनी मशीन लर्निंग / आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेंबर्सच्या प्रायव्हसीपासून आपल्या पेमेंट प्रोसेस आणि इतर रेव्हेन्यूवर  केंद्रित उपक्रमांसाठी जोर देत आहे.

हॉलिवूडमध्ये एआयला तीव्र विरोध 
या नोकरीसाठी उमेदवाराकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय मशीन लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करण्याचाही अनुभव असावा. दरम्यान, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये एआयच्या जाहिरातीमुळे हॉलिवूडमध्ये तीव्र विरोध होत आहे. अमेरिकेतील लेखक आणि कलाकारांच्या अनेक संघटना संपावर आहेत.

Web Title: netflix offering 7 crore salary package artificial intelligence jobs for ai professionals tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.