कृषी क्षेत्रातील नवीन क्षितिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:43 AM2018-06-01T01:43:18+5:302018-06-01T01:43:18+5:30
भारत कृषी प्रधान देश आहे. कृषीक्षेत्रात आपण आज प्रगती करीत आहोत. या क्षेत्रात कार्यरत होऊन प्रगतीशील होण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.
भारत कृषी प्रधान देश आहे. कृषीक्षेत्रात आपण आज प्रगती करीत आहोत. या क्षेत्रात कार्यरत होऊन प्रगतीशील होण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. आज आपण या क्षेत्राशी संबंधित करिअर कसे करता येईल ते जाणून घेणार आहोत. कृषी विज्ञान, कृषी अर्थशास्त्र आणि कृषी अभियांत्रिकी तसेच पुष्पोत्पादन आणि उद्यान कृषी ह्या काही कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण शाखा आहेत ज्यांची आपण माहिती घेणार आहोत.
कृषी विज्ञान
कृषी विज्ञान म्हणजे कृषी क्षेत्राच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यापारिक बाजूंचा अभ्यास करणे. कृषी विज्ञानमध्ये शेतीचे उत्पादन वाढविणे, उत्तम प्रतीचे उत्पादन करणे आणि धान्य उत्पादनात येणाऱ्याअडथळ्यांवर मात करणे या विषयांशी संबंधित संशोधन
आणि विकास यावर काम केले
जाते.
या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी इ.रू. (कृषी विज्ञान) ही पदवी मिळवावी लागते. पदव्युतर शिक्षणात म्हणजेच ट.रू. मध्ये सोइल कन्जर्वेशन, वॉटर कन्जर्वेशन, प्लांट फिसिओलॉजी, फार्मिंग सिस्टीम मॅनेजमेंट, सिड टेक्नॉलॉजी इ. अनेक विषयांचा अभ्यास करता येतो. या शिक्षणाचा उपयोग स्वयंरोजगारात करता येतो. तसेच सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होते.
कृषी अर्थशास्त्र
भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. यामुळे कृषी अर्थशास्त्राला विशेष महत्त्व आहे. कृषी अर्थशास्त्रामध्ये कृषी उत्पादन आणि कृषी व्यवसाय यांचा अभ्यास करून अर्थशास्त्रातील सिद्धान्ताचा वापर करून कृषी उत्पादनातील अडचणींना दूर करणे त्याचप्रमाणे कृषी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे यांचा समावेश होतो.
या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी इ.रू. (कृषी अर्थशास्त्र ) यात पदवीधर होणे गरजेचे आहे, त्यानंतर ट.रू. म्हणजेच पदव्युतर शिक्षणामध्ये फार्मिंग फायनान्स, पॉलिसी, मार्केटिंग, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट यांचा अभ्यास केला जातो. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर अनेक शासकीय संस्थांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होते.
कृषी अभियांत्रिकी
कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रात फार्म इक्विपमेंट, रुलर स्ट्रक्चर, इरिगेशन आणि ड्रेनेज तसेच रुलर इलेक्ट्रिसिटी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. थोडक्यात सांगायचे तर या क्षेत्रात अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढवणारी साधने बनविली जातात. या क्षेत्राचा गेल्या काही वर्षांत बराच विस्तार झाला आहे. या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग चा डिप्लोमा, इ.ए. / इ.ळीूँ. , ट.ए. / ट.ळीूँ. मिळवावे लागते. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर शासकीय आणि खाजगी कंपन्या, संशोधन विभाग अशा अनेक ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होते.
पुष्पोत्पादन
पुष्पोत्पादन म्हणजेच फुलांची शेती. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या व्यवसायाने चांगला जम बसविला आहे. विविध फुले आणि शोभेची झाडे यांची शेती करून ते बाजारपेठ तसेच कॉस्मेटिक आणि परफ्युम इंडस्ट्रीला पुरविणे हा या व्यवसायाचा प्रमुख भाग आहे. या क्षेत्रात येण्यासाठी कृषी विज्ञानात पदवीधर होऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी फ्लोरीकल्चर किंवा होर्टिकल्चर या विषयांची निवड करू शकता.
उद्यान कृषी
उद्यान कृषी म्हणजेच होर्टीकल्चर थोडक्यात सांगायचे तर बागायत काम. यामध्ये फलोत्पादन, पुष्पोत्पादन, औषधी वनस्पतींची बागायत केली जाते. या क्षेत्रात झाडे त्यांची सुंदरता, उपयोगता, त्यांचा वापर तसेच त्यांचे उत्पादन वाढविणे यावर भर दिला जातो. ही शाखा फूड प्रोडक्शनच्या शाखेशी निगडित आहे. या क्षेत्रात येण्यासाठी होर्टीकल्चरमध्ये पदवीधर किंवा पदव्युतर म्हणजेच इ.रू. आणि ट.रू. मिळविणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील शिक्षणानंतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत होता येते. संशोधन क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत.
- डॉ. श्रेया उदारे
करिअर काऊन्सलर