Government Jobs: NHM मध्ये मोठी भरती; पदवीधारकांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:34 PM2021-05-07T16:34:43+5:302021-05-07T16:35:27+5:30
Government Jobs: पदवीधारकांना केंद्र सरकारच्या एका विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.
मुंबई: कोरोना संकटाच्या काळात हळूहळू अनेक गोष्टी पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे. सरकारच्या अनेक विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. पदवीधारकांना केंद्र सरकारच्या एका विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. विविध आरोग्यविषयक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. (nhm ratnagiri recruitment 2021 for 166 posts for medical staff in ratnagiri)
राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरी मध्ये १६६ पदांवर भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल ते रत्नागिरी प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केलेला अर्ज भरू शकतात. एनएचएम रत्नागिरी भरती २०२१ साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मे २०२१ आहे.
DFCCIL: भारतीय रेल्वेच्या ‘या’ विभागात १०७४ पदांवर भरती; १.६० लाखांपर्यंत पगार
कसा कराल अर्ज?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रत्नागिरी प्रशासनाच्या वेबसाइटवर जावे. तेथे भरती सेक्शनमध्ये जाऊन ‘रिक्रूटमेंट फॉर कोविड-19’ च्या लिंक पर क्लिक करावे. यानंतर संबंधित जाहिरात उघडेल. उमेदवार पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. तो अर्ज भरून तसेच विचारलेली प्रमाणपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या मेलवर पाठवायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२१ आहे.
Indian Navy मध्ये २५०० हजार रिक्त पदांसाठी मोठी भरती; ६९ हजारांपर्यंत पगार
कोणत्या पदांवर किती पदे?
फिजिशियनच्या ६ पदांसाठी एमडी मेडिसीनची पदवी, एनेस्थिसियोलॉजिस्टच्या १५ पदांसाठी एमडी, डीए आणि डीएनबीची पदवी, माइक्रोबॉयोलॉजिस्टच्या २ पदांसाठी माक्रोबॉयोलॉजीमध्ये एमडीची पदवी, मेडिकल ऑफिसरच्या १५ पदांसाठी एमबीबीएस डिग्रीची पदवी, आयुष मेडिकल ऑफिसरच्या १२ पदांसाठी बीएएमएस किंवा बीयूएमएस किंवा बीडएसची पदवी, स्टाफ नर्सच्या १०० पदांसाठी बीएससी नर्सिंगची पदवी, लॅबोरेटरी टेक्निशियनच्या १६ पदांसाठी बीएससी डीएमएलटीची पदवी असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा, असे सांगितले जात आहे.